निवृत्त मुख्याध्यापक घस्तींकडून केळकर हायस्कूलास खुर्च्या
esakal July 04, 2025 01:45 AM

swt३१४.jpg
७५०००
वाडाः येथील अ. कृ. केळकर हायस्कूलचे मुख्याध्यापक सुनील घस्ती यांचा सेवानिवृत्ती निमित्ताने सपत्नीक सत्कार करण्यात आला.

निवृत्त मुख्याध्यापक घस्तींकडून
केळकर हायस्कूलास खुर्च्या
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २ः वाडा (ता.देवगड) येथील अ. कृ. केळकर हायस्कूलचे मुख्याध्यापक सुनील घस्ती सेवानिवृत्त झाले. त्यांची एकूण ३१ वर्ष ४ महिने इतकी सेवा झाली. यानिमित्ताने संस्था आणि शाळेच्यावतीने सपत्नीक त्यांचा सत्कार करून त्यांना निरोप देण्यात आला. वडिलांच्या संस्कारातून आपण घडलो असल्याचे श्री. घस्ती यांनी यावेळी सांगून वडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ १०० प्लास्टिक खुर्च्या प्रशालेला देणगी स्वरुपात दिल्या.
यावेळी स्थानीय समिती अध्यक्ष शांताराम पुजारे, स्थानीय समिती कार्यवाह दिनकर जोशी, शाळा समिती अध्यक्ष हर्षद जोशी, शाळा समिती सदस्य महेंद्र मांजरेकर, नारायण माने, दर्शन नार्वेकर, माजी मुख्याध्यापक संजीव राऊत, ज्येष्ठ शिक्षिका स्मिता तेली, सौ. सरिता घस्ती, सुरेश घस्ती, संकल्प घस्ती, सौ. प्रतीक्षा घस्ती, माजी पर्यवेक्षक तानाजी पाटील आदी उपस्थित होते. यावेळी संस्था, शाळा यांच्यावतीने श्री. घस्ती यांचा सन्मान करण्यात आला. माजी विद्यार्थ्यांनीही यावेळी श्री. घस्ती यांचा सन्मान करून शुभेच्छा दिल्या. दरम्यान, यावेळी प्रशालेच्या सेवाज्येष्ठ शिक्षिका स्मिता तेली यांची मुख्याध्यापकपदी नेमणूक झाल्याने त्यांचेही अभिनंदन करण्यात आले.
श्री.घस्ती यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आढावा विद्यार्थ्यांनी घेतला. यावेळी शिक्षकांमधून आकाश तांबे, सचिन मोरे, शिक्षकेत्तर कर्मचार्यांमधून गणपत हिंदळेकर यांनी मनोगत व्यक्त केले. श्री. पुजारे आणि हर्षद जोशी यांनी श्री. घस्ती यांच्या कार्याचा आढावा घेतला. सूत्रसंचालन भूषण दातार यांनी केले. स्वागत मिलिंद लेले यांनी केले. आभार निलेश तिर्लोटकर यांनी मानले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.