swt221.jpg
74820
सावंतवाडी ः उपजिल्हा रुग्णालयात ''डॉक्टर्स डे'' साजरा करण्यात आला.
डॉक्टरांनी सेवाभावी वृत्ती जपावी
डॉ. ज्ञानेश्वर ऐवळेः सावंतवाडी रुग्णालयात ‘डॉक्टर्स डे’
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २ः ‘डॉक्टर म्हणजे देव’ ही भावना आजही रुग्णांच्या मनात कायम आहे आणि डॉक्टरांची सेवाभावी वृत्ती आजही ती जपते आहे. त्यामुळे प्रत्येक डॉक्टरने आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावावे, असे आवाहन सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांनी केले. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात ‘डॉक्टर्स डे’ उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून डॉ. ऐवाळे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते केक कापून डॉक्टर्स डे साजरा करण्यात आला. यावेळी बोलताना डॉक्टरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. डॉक्टर नेहमीच सेवाभावी वृत्तीने काम करतात, ते आपल्या कुटुंबाला पुरेसा वेळ देऊ शकत नाहीत, परंतु रुग्णांना बरे करण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. म्हणूनच रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक डॉक्टरांना देवाप्रमाणे मानतात, असे त्यांनी सांगितले.
डॉ. विधानचंद्र रॉय यांच्या जयंतीनिमित्त केक कापण्यात आला. तसेच सहकारी डॉक्टर्सना गुलाब पुष्प देऊन डॉक्टर्स दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी डॉ. ऐवळे यांना उत्कृष्ट सेवेबद्दल प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. परिचारिका विजया उबाळे, प्राची राणे, दीक्षा वेंगुर्लेकर, श्रीमती बागेवाडी, श्रीमती गोसावी आणि रुग्णसेविकांनीही आपले विचार व्यक्त केले.
या कार्यक्रमाला डॉ. गिरीशकुमार चौगुले, डॉ. प्रवीण देसाई, डॉ. सागर जाधव, डॉ. गोविंद आंबुरे, डॉ. शिवम तसेच सिटीस्कॅन विभागातील प्रथमेश परब उपस्थित होते.