महादेव मुंडेंना मारुन टेबलावर हाडं, कातडं ठेवली; बाळा बांगरांच्या आरोपानंतर पत्नी ज्ञानेश्वरी म
Marathi July 04, 2025 04:25 AM

अंडे: ‘संतोष देशमुख यांच्या अपहरण व हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या वाल्मिक कराडने माझ्यासमोर तिघांना मारलं .मी साक्षीदार आहे .महादेव मुंडेंना मारल्यानंतर वाल्मिक कराडच्या टेबलवर त्याचा हाड, कातडं आणि रक्त आणून ठेवलं होतं .संतोष देशमुख यांच्या हत्येपूर्वी तुला सरपंचाच्या खुनात अडकवणार अशी धमकी वाल्मिक कराडने दिली होती, असा आरोप वाल्मीक कराडचा जुना सहकारी विजयसिंह (बाळा) बांगर यांनी आज पत्रकार परिषदेत केला होता . यावरूनच ज्ञानेश्वरी मुंडे यांनी बांगर यांचा जबाब घेत आरोपींना अटक करावी .कारण त्यांना आरोपी माहीत आहेत . अशी मागणी पोलीस अधीक्षकांना केली आहे .

काय म्हणाल्या ज्ञानेश्वरी मुंडे ?

बीडच्या परळीतील महादेव मुंडे खून प्रकरणात मोठा खुलासा विजयसिंह उर्फ बाळा बांगर यांनी केला होता यानंतर आता यावर परळीतील मृत व्यापारी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बांगर यांचा जबाब घेऊन आरोपींना अटक करण्यात यावी कारण त्यांना आरोपी माहीत आहेत आणि त्यांची फिर्याद देखील घ्यावी.अशी माझी एस पी साहेबांना विनंती आहे त्याचबरोबर एसपी साहेबांना देखील आरोपी निष्पन्न झाले आहेत,पण ते आरोपीची पाठराखण का करत आहेत? तत्कालीन पोलीस निरीक्षक सानप यांचे देखील चौकशी करावी.

या प्रकरणाची चौकशी केज येथील पोलीस अधिकाऱ्याकडे देण्यात आलीय. मात्र, ते भेटायला देखील आले नाहीत. याबाबतीत आंदोलन उपोषण केले. मात्र, अद्याप आम्हाला न्याय नाही. काल बांगर यांनी आरोपीचे नाव घेऊन टेबलवर मांस ठेवल्याचे सांगितले.तरी देखील एसपी आणखी शांत का आहेत? पोलिसांवर कोणाचा दबाव आहे हे तपासले पाहिजे. सानप यांचे सीडीआर काढले पाहिजेत. एसपी सरांनी यात कुणाचा दबाव आहे का ते सांगावे. नाहीतर केस बंद करून टाकावी. या प्रकरणात प्रशासन दुर्लक्ष करत आहे हे दिसून येतय. आरोपीची पाठराखण का केली जात आहे ,हे तपासले पाहिजे.

नेमकं काय म्हणाले बांगर?

वाल्मीक कराडचे जुने सहकारी विजयसिंह (बाळा) बांगर हे त्याच्यापासून दूर झाल्यानंतर वाल्मीकने माझ्यासोबत काम कर असा हट्ट धरला होता. मात्र विजयसिंह बांगर यांनी त्याच्यासोबत काम करण्यास नकार दिला होता, त्यामुळे त्या दोघांमध्ये खटके उडायला सुरुवात झाली होती. यानंतर काल (बुधवारी) विजयसिंह बांगर यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक खुलासे केले आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्येपूर्वीच तुला एका सरपंचाच्या खुनामध्ये अडकवणार अशी वाल्मिकने  फोनवरून मला धमकी दिली होती ,असा दावा बांगर यांनी केला आहे. महादेव मुंडे यांना मारल्यानंतर वाल्मीक कराडच्या टेबलावर त्यांचं कातडं, हाड आणि रक्त आणून ठेवलं होतं. यानंतर वाल्मीक कराडने मारणाऱ्यांना शाबासकी दिली आणि गाड्याही गिफ्ट दिल्या, असा गौप्यस्फोट विजयसिंह बांगर यांनी केला आहे.

संबंधित बातमी:

Walmik Karad: मी वाल्मिक कराडच्या टेबलवर महादेव मुंडेंच्या शरीरावरील कातडं अन् हाडं पाहिलेत, जुन्या साथीदाराचा खळबळजनक आरोप

आणखी वाचा

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.