Shubman Gill Records: कॅप्टन गिलची २६९ धावांची खेळी अन् १३ मोठे विक्रम; गावस्कर, तेंडुलकर, कोहली यांच्यावर ठरला वरचढ
esakal July 04, 2025 06:45 AM

Shubman Gill's Marathon Innings Sets 13 New Records in Test Cricket

भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिलने गुरुवारी इंग्लंडविरुद्ध एजबॅस्टन येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीचा दुसरा दिवस गाजवला. भारताने पहिल्या डावात ५८७ धावांपर्यंत पोहोचवण्यासाठी शुभमनने आपल्या कसोटी कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी केली. शुभमन गिलने ३८७ चेंडूंचा सामना करत ३० चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने २६९ धावा केल्या.दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडने ३ बाद ७७ धावा केल्या होत्या आणि ते अजूनही ५१० धावांनी मागे आहेत. शुभमनने २६९ धावांच्या खेळीसह १३ विक्रम मोडले.

  • शुभमन गिलने SENA (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया) देशांमध्ये भारतीय फलंदाजाद्वारे सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या करण्याचा विक्रम नावावर केला आहे. यापूर्वी हा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर होता, त्याने २००४ मध्ये सिडनी क्रिकेट ग्राउंडवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद २४१ धावा केल्या होत्या.

  • शुभमन गिलने माजी कर्णधार विराट कोहलीचा भारतीय कर्णधाराद्वारे कसोटी क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम मोडला. ऑक्टोबर २०१९ मध्ये पुण्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने कर्णधार म्हणून २५४ धावा केल्या होत्या.

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral
  • इंग्लंडमध्ये २५०+ धावा करणारा शुभमन गिल हा ऑस्ट्रेलियाचा बॉब सिम्पसन (१९६४ मध्ये ३११) आणि दक्षिण आफ्रिकेचा ग्रॅमी स्मिथ (२००३ मध्ये २७७ न २५९) यांच्यानंतरचा तिसरा परदेशी कसोटी कर्णधार ठरला आहे.

  • परदेशातील कसोटीत २५०+ धावा करणारा शुभमन गिल हा वीरेंद्र सेहवाग ( मुलतानमध्ये ३०९ आणि लाहोरमध्ये २५४) आणि राहुल द्रविड (रावळपिंडीमध्ये २७० ) यांच्यानंतरचा तिसरा भारतीय फलंदाज आहे.

  • कसोटी क्रिकेटमध्ये द्विशतक करणारा शुभमन गिल हा मन्सुर अली खान पतौडी, सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली (सात वेळा) यांच्यानंतरचा सहावा भारतीय कर्णधार ठरला आहे.

  • शुभमन गिल हा (२५ वर्षे आणि २९८ दिवस) मन्सुर अली खान पतौडी (२३ वर्षे आणि २३९ दिवस) नंतर कसोटी क्रिकेटमध्ये द्विशतक करणारा दुसरा सर्वात तरुण भारतीय कर्णधार आहे.

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिलसमोर इंग्लंडने गुडघे टेकले! गावस्करांचा ४६ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, जगात भारी ६ पराक्रमही केले
  • मोहम्मद अझरुद्दीन, दिलीप वेंगसरकर आणि राहुल द्रविड (दोनदा) यांच्यानंतर इंग्लंडविरुद्ध सलग तीन कसोटीत तीन शतके करणारा गिल चौथा भारतीय फलंदाज आहे.

  • इंग्लंडविरुद्ध सलग कसोटी शतके करणारा शुभमन गिल हा विजय हजारे आणि मोहम्मद अझरुद्दीन यांच्यानंतरचा तिसरा भारतीय कर्णधार आहे.

  • कर्णधार म्हणून पहिल्या कसोटीत शतक आणि दुसऱ्या कसोटीत द्विशतक करणारा गिल हा सुनील गावस्कर यांच्यानंतरचा दुसरा भारतीय आहे.

  • शुभमन गिल हा SENA देशांमध्ये द्विशतक करणारा पहिला आशियाई कर्णधार आहे. यापूर्वी श्रीलंकेच्या तिलकरत्ने दिलशानने २०११ मध्ये लॉर्ड्सवर इंग्लंडविरुद्ध १९३ धावा केल्या होत्या, जी आशियाई कर्णधाराची सर्वोत्तम धावसंख्या होती.

Vaibhav Suryavanshi सह भारताच्या युवा संघाने केला १०० किलोमीटर प्रवास; काल मॅच जिंकली अन्... कारण वाचून वाटेल आश्चर्य
  • शुभमन हा परदेशी कसोटीत द्विशतक करणारा विराट कोहलीनंतरचा दुसरा भारतीय कर्णधार आहे.

  • शुभमन गिलने आता इंग्लंडमध्ये भारतीय फलंदाजाद्वारे सर्वोच्च कसोटी धावसंख्येचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्याने सुनील गावस्कर यांचा (१९७९ मध्ये ओव्हल येथे २११) विक्रम मोडला.

  • शुभमनच्या २६९ धावांच्या खेळीने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत (WTC) भारतासाठी सर्वोच्च धावसंख्या करण्याचा कोहलीचा (२५४) विक्रम मोडला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.