Thane News: तरुणाला मस्ती पडली महागात! धरणात बुडाला अन्..; ठाण्यातील धक्कादायक घटना
esakal July 04, 2025 06:45 AM

बदलापूर : पावसाळ्याला सुरुवात होताच अनेकजण मित्र परिवारासह धबधब्यात भिजायला जातात. अशावेळी अनेकजण धबधब्यात बुडल्याच्या घटना घडल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून अशा अपघाताच्या घटना घडत असताना बदलापूरमध्येही अशीच घटना घडल्याचे समोर आले आहे.

बदलापूर जवळील भोज धरणातील बंधाऱ्यावर पाण्याची मस्ती एका पर्यटकाच्या चांगलीच अंगलट आल्याचे समोर आले आहे. मस्ती करण्याच्या नादात हा पर्यटक प्रवाहातच अडकला. आपला जीव वाचवण्यासाठी तो आरडाओरडा करू लागला. त्यानंतर लगेचच त्याच्या मित्रांनी धाव घेत त्याच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू केले.

दरम्यान, यानंतर एकाने त्याला बंधाऱ्यावरून काठीचा आधार दिला. तर इतर पर्यटकांनी साखळी करत त्याला पाण्याबाहेर काढलं. अखेर या पर्यटकाची सुटका करण्यात आली. याचाच व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

पोलिसांप्रमाणे लष्करी जवानांनाही गोळ्यांचा हिशेब द्यावा लागतो का? जाणून घ्या...

बदलापूर जवळील कोंडेश्वर हे पर्यटन स्थळ असून या पर्यटन स्थळाच्या बाजूला भोज धरण आहे. भोज धरणाच्या बंधाऱ्यावरुन पडणाऱ्या पाण्याचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक इथं येत असतात, मात्र पाण्याचा अंदाज नसतानाही काही पर्यटक या बंधाऱ्यावर मस्ती करतात आणि ही मस्ती त्यांच्या जीवावर बेतते.

पर्यटकांनी पाण्यात उतरू नये म्हणून जिल्हाधिकार्यांनी बंदी घातली आहे. मात्र काही पर्यटक हे नियमांचं करून पाण्यात उतरतात आपला जीव गमावतात. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना निसर्गाचा आनंद घेता येत नाही. पर्यटकांनी पाण्यात उतरू नये अशा स्पष्ट सूचना या धरणाच्या बाजूला लिहिल्या आहेत. मात्र काही पर्यटक हे या नियमांकडे दुर्लक्ष करतात त्यामुळे काही विपरीत दुर्घटना घडतात.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.