भारत इंग्लंड अंडर 19 वनडे मालिकेतील चौथ्या सामन्यात वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ घोंघावलं. 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीने इंग्लंडच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. चौथ्या वनडे सामन्यात वैभवने 190 हून अधिकच्या स्ट्राईक रेटने शतक ठोकलं. या मालिकेत वैभव सूर्यवंशीचं दोनदा अर्धशतकाची संधी हुकली होती. तर एकदा शतक होता होता राहिलं. मात्र चौथ्या सामन्यात इंग्लंडवर भारी पडला. सुरुवातीपासूनच वैभव सूर्यवंशीने आक्रमक पवित्रा दाखवला. त्याने षटकार आणि चौकार मारत इंग्लंड गोलंदाजांना जेरीस आणलं. वैभव सूर्यवंशीने फक्त 52 चेंडूत 10 चौकार आणि 7 षटकार मारत शतक पूर्ण केलं. यापूर्वी अंडर 19 क्रिकेट स्पर्धेत इतक्या वेगाने कोणीही शतक ठोकलं नव्हतं. वैभवने 78 चेंडूत 13 षटकार आणि 10 चौकार मारत 143 धावांची खेळी केली. त्याचा स्ट्राईक रेट 183.33 चा होता.
यापूर्वी वैभव सूर्यवंशीने 2 जुलैला नॉर्थम्प्टन येथे खेळलेल्या तिसऱ्या सामन्यात 31 चेंडूत 86 धावा केल्या होत्या. या खेळीतही त्याने सहा चौकार आणि सहा षटकार मारले होते. पावसामुळे भारतापुढे 40 षटचकात 269 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. पण वैभव सूर्यवंशीच्या आक्रमक खेळीमुळे हे लक्ष्य अवघ्या 34.3 षटकात पूर्ण झालं. यासह भारताने पाच सामन्यांच्या वनडे मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली होती. तसेच या सामन्यात त्याला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं होतं. या सामन्यातही त्याने चमकदार कामगिरी केली आहे. हा सामना भारताने जिंकला तर मालिका खिशात घालेल.
पहिल्या दोन सामन्यात वैभव सूर्यवंशी 40हून अधिक धावा केल्या होत्या. पहिल्या सामन्यात त्याने 48 धावांची खेळी केली होती. तेव्हा त्याचं अर्धशतक फक्त दोन धावांनी हुकलं होतं. तर दुसऱ्या सामन्यात 45 धावा केल्या मात्र पाच धावा तोकड्या पडल्या. पण चौथ्या सामन्यात सामन्यात त्याने ही सर्व कसर भरून काढली आहे. वैभवने जयपूरमध्ये गुजरात टायटन्सविरुद्ध 35 चेंडूत स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात जलद शतक झळकावले होते. तेव्हा त्याच्या नावाची सर्वत्र चर्चा सुरु झाली होती. आता त्याचा इंग्लंडमध्येही असाच फॉर्म सुरु आहे.