Nashik News : "आम्ही सुरक्षित नाही!" नाशिकच्या वकिलांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा; हल्लेखोरांना कठोर शिक्षेची मागणी
esakal July 05, 2025 09:45 PM

नाशिक- मांडसांगवी (ता. नाशिक) येथील ॲड. रामेश्वर बोराडे यांना झालेल्या मारहाणीच्या प्रकरणातील संशयित हल्लेखोरांना कडक शासन करावे, वकिलांच्या सुरक्षिततेसाठी असलेला ॲडव्होकेट्स प्रोटेक्शन ॲक्ट व ॲडव्होकेट्स वेल्फेअर ॲक्ट लागू करावा अशी मागणी नाशिक बार असोसिएशनतर्फे करण्यात आली. याबाबत शुक्रवारी (ता.४) जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले.

नाशिक बार असोसिएशनतर्फे देण्यात आलेल्या निवेदनात ॲड. बोराडे यांच्यावर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमांनी जीवघेणा हल्ला केला. समाजातील पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी वकील अविरतपणे झगडत असतात. न्यायव्यवस्था आणि पक्षकार यांच्यामधील ते दुवा आहेत.

मात्र, सदरची घटनाही वकीलच आज सुरक्षित नसल्याचे घोतक असल्याची व्यथा यावेळी नमुद करण्यात आली. ॲड. बोराडे हल्ला प्रकरणातील गुन्ह्याचा तपास योग्यरितीने व निष्पक्षपातीपणे करताना जलदगती न्यायालयात हा खटला चालविण्यात यावा. ॲडव्होकेट्स प्रोटेक्शन ॲक्ट व ॲडव्होकेट्स वेल्फेअर ॲक्टचा मसुदा तयार असूनही शासनाने तो लागू केलेला नाही.

पण, वकीलांवर दिवसेंदिवस होणाऱ्या प्राणघातक हल्ल्याचा विचार करता या कायद्यांची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी नाशिक बार असोसिएशनतर्फे करण्यात आली. अन्यथा नाइलाजास्तव राज्यातील वकिलांना आंदोलन, मोर्चे व उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागले, असा इशाराही यावेळी देण्यात आला. निवेदन देण्यापूर्वी जिल्हा न्यायालय ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी निषेध रॅली काढण्यात आली.

Manoj Jarange: मनोज जरांगे पाटील यांना नारायण गडावर महापूजेचा मान; मराठा समाजाचा सन्मान!

याप्रसंगी असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. नितीन ठाकरे, उपाध्यक्ष ॲड. वैभव शेटे, ॲड. जालिंदर ताडगे, ॲड. अविनाश भिडे, ॲड. जयंत जायभावे, सचिव ॲड, हेमंत गायकवाड, ॲड. संजय गिते, ॲड. सोनल गायकर, ॲड. कमलेश पाळेकर, ॲड. शिवाजी शेळके आदी उपस्थित होते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.