अनमोड घाटातील भेगा पडलेला रस्ता अखेर शुक्रवारी रात्री खचला. यामुळे मार्गावरुन वाहतूक करणे आता धोक्याचे झाले आहे. दूधसागर मंदिराच्या जवळच्या रस्त्याला भेगा पडल्या होत्या, खबरदारी म्हणून या भागात बॅरिकेड्स लावण्यात आले होते. अखेर रात्रीच्या सुमारास हा रस्ता खचला आहे.