Chanakya Niti : या 5 गोष्टींमध्ये पुरुष महिलांच्या पुढे टिकूच शकत नाहीत, चाणक्य काय म्हणतात?
Tv9 Marathi July 07, 2025 03:45 AM

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये आर्य चाणक्य यांनी माणसान आदर्श जीवन कसं जगावं याचं थोडक्यात सार सांगितलं आहे. आयुष्य जगत सताना कोणत्या चुका करू नयेत, काय करावं? याबद्दल त्यांनी आपल्या या ग्रंथामध्ये मार्गदर्शन केलं आहे. आर्य चाणक्य यांचे हे विचार आजही अनेकांना आपलं आयुष्य जगत  असताना मार्गदर्शक ठरतात.

आर्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये महिलांसंदर्भात देखील अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. ज्यामध्ये आदर्श पत्नी कशी असावी? आदर्श पत्नीची लक्षणं काय आहेत? महिलांना कोणत्या गोष्टी सांगू नयेत? आईची कर्तव्य काय आहेत? अशा एकना अनेक गोष्टी आर्य चाणक्य यांनी आपल्या ग्रंथामध्ये सांगितल्या आहेत. दरम्यान आर्य चाणक्य यांनी अशा पाच गोष्टी सांगितल्या आहेत, त्यात पुरुष महिलांसमोर टिकूच शकत नाही असं चाणक्य म्हणतात. जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे ते?

धैर्य – आर्य चाणक्य म्हणतात महिला या भावनिक दृष्या खूप मजबूत असतात, तसेच त्या साहसी देखील असतात. जेव्हा खरी वेळ येते, तेव्हा त्या धैर्याच्या बाबतीत पुरुषांपेक्षा कितीतरी पटीनं पुढे असतात.

चतुरपणा – आर्य चाणक्य म्हणतात चातुर्य हा महिलांकडे असलेला विशेष गुण असतो, त्या आपल्या हुशारीनं कोणत्याही कठीण परिस्थितीमधून मार्ग काढतात.

समजूतदारपणा – आर्य चाणक्य म्हणतात महिला जो समजूतदारपणा दाखवतात, तेवढा समजूतदारपणा पुरुष कधीही दाखवू शकणार नाहीत.

कुटुंबाला जोडून ठेवण्याची ताकत  – आर्य चाणक्य म्हणतात महिलांकडे कुटुंबाला जोडून ठेवण्याची ताकत असते, पुरुष हे काम करू शकत नाही.

निर्णय क्षमता – चाणक्य म्हणतात महिलांकडे पुरुषांपेक्षा अधिक निर्णय घेण्याची क्षमता असते. त्या कठिण परिस्थितीमध्ये योग्य निर्णय घेऊ शकतात.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.