वरळीतबोलताना आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर आणि भाजपवर जोरदार टीका केली. त्यांनी सांगितले की, सरकार सध्या केवळ गाजर दाखवत आहे, पण लोकांच्या प्रश्नांबाबत पूर्णपणे असंवेदनशील आहे. हे सरकार महाराष्ट्राचं नाही, तर निवडणूक आयोगाचं आहे, त्यामुळे त्यांना जनतेच्या प्रश्नांची अजिबात फिकीर नाही. काल मराठी जनतेनं एकत्र येऊन ताकद दाखवली आणि त्यामुळे महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या पोटात दुखू लागलं आहे. ठाकरे यांनी संजय गायकवाड आणि प्रताप सरनाईक यांच्यावरही निशाणा साधत त्यांचं वर्तन "नौटंकी" असल्याचं सांगितलं. ते म्हणाले, “पत्र लिहिण्याऐवजी थेट फोन करू शकतात, संवादच नाही काय?”
तसेच, प्रतापराव जाधव यांच्यावरही टीका करत त्यांनी भाजपला "मराठी माणसांचा खरा दुश्मन" ठरवलं. भाजपने मराठी माणसांची तुलना पाकिस्तान्यांशी केली असल्याने, त्यांनी जनतेची माफी मागावी, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.
Nashik Live: गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ; नाशिककरांना सतर्कतेचा इशारानाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे. गंगापूर धरणातून ५,१८६ क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून, यामुळे रामकुंड व गोदाघाट परिसरात पुराच्या पाण्याची पातळी दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पोहोचली आहे. याआधी हा विसर्ग ४,६५६ क्यूसेक होता, मात्र आता ५०३ क्यूसेकने वाढवण्यात आला आहे. शहरात कालपासून पावसाचा जोर टिकून असल्याने नदी काठच्या भागांमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून, नदीकाठी जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे.
Ashadhi Ekadashi Live: वांद्रे पूर्व येथील संत ज्ञानेश्वर मंदिर शासकीय वसाहतीत भव्य दिंडी सोहळा आणि कीर्तन महोत्सवाचे आयोजनवांद्रे पूर्व येथील श्री संत ज्ञानेश्वर मंदिर शासकीय वसाहतीत आषाढी एकादशीच्या निमित्ताने पारंपरिक भक्तीमय वातावरणात भव्य दिंडी सोहळा आणि कीर्तन महोत्सव आयोजित करण्यात आला. जयंत वाणी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या धार्मिक कार्यक्रमात सकाळी काकड आरतीपासून सुरुवात होऊन भजन, महापूजा, हरिपाठ आणि प्रवचनांनी परिसर भक्तिरसात न्हालेला पाहायला मिळाला. दुपारी पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि टाळ-मृदुंगांच्या लयीत रंगलेली भव्य दिंडी शासकीय वसाहतीत निघाली, ज्यात लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत अनेक वारकऱ्यांनी पारंपरिक पोशाखात सहभागी होऊन विठ्ठलनामाचा जयघोष केला. मुंबईतील नागरिकांनी या सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
Sangli News: सांगली जिल्ह्यातील विटा शहरातील बाजारात वाघाटी फळाचे दर गगनालाआषाढी एकादशीचा उपवास सोडताना ताटात वाढल्या जाणारी वाघाटी प्रतिकिलो ६०० रूपये दराने विक्री केली जात होती. त्यामुळे ही वाघाटी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहे. वारकरी संप्रदायातील लोक या वाघाटीला अधिक महत्त्व देतात. वर्षातून एकदा आषाढी एकादशीला वाघाटी खाण्यामागे आयुर्वेदाचा विचार असल्याचे सांगितले जाते. काळाच्या ओघात हे वाघाटी फळ नामशेष होत चालले आहे.
हिंदू मुस्लिम एक्याचे प्रतीक असलेल्या सवारीची मिरवणूकफुलंब्री शहरात हिंदू - मुस्लीम एकतेचे प्रतिक असलेले ताबूत (सवारी) विजर्जन मिरवणूक रविवरी (ता.सहा) दुपारी १ ते पाच च्या दरम्यान पार पडली. यावेळी शहरातील मुख्य रस्त्यावरुन काढण्यात आलेल्या सवारी मिरवणूकीत रेवडी व खारीक प्रसाद म्हणुन उधळण्यात येतो. शहरात तीन प्रमुख ठिकाणी या सवाऱ्या दहा दिवसासाठी भक्तिभावाने पूजा करून बसविण्यात येतात.
Sangli News: कडेगावात मोहरमनिमित्त गगनचुंबी तांबुतांच्या गळाभेटीदीडशे वर्षांची हिंदू-मुस्लिम ऐक्याची ऐतिहासिक परंपरा असलेल्या येथील मोहरमनिमित्त आज गगनचुंबी ताबूत भेटीचा सोहळा संपन्न झाला.डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या या सोहळ्याला राज्यासह कर्नाटक सीमाभागातून सुमारे लाखांवर भाविकांनी हजेरी लावली.अलोट उत्साहात ताबूत भेटीवेळी उपस्थित भाविकांनी 'दुला दुला' व 'मौला अली झिंदाबाद' असा एकच जयघोष केला.
Jalgaon News: समाज माध्यमांवर अभद्र वाच्यता केल्याप्रकरणी वरणगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखलभुसावळ मतदारसंघांचे आमदार तथा राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांना व त्यांच्या परिवारा विषयी अश्लील, अभद्र अपशब्द व जातीवाचक शिवराळ भाषा वापरल्याने. भुषण बाबूराव पाटील नामक माथेफिरू विरुध्द वरणगाव पोलिसांत अॅट्रासीटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी भाजपाच्या माजी नगर अध्यक्षा अरूणा इंगळे, यांनी वरणगाव पोलिस स्टेशनचे पोलिस अधिकारी अमितकुमार बागुल यांचेकडे गुन्हा दाखल करण्या विषयी मागणी केली होती.
Kolhapur News: प्रति पंढरपूर नंदवाळ आषाढी वारीमध्ये हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शनआज प्रति पंढरपूर नंदवाळ ता. करवीर येथे मोठ्या उत्साहात आषाढी वारीनिमित्त विठ्ठल रुक्मिणी च्या दर्शनासाठी लाखो भाविकांचा जनसमुदाय लोटला होता. या वारीमध्ये कागल येथील मुस्लिम बांधव बालूचांद बामणीकर रा. बेनिक्रे वय ६५ हे आपल्या मराठी बांधवांच्या सोबत विठू रायाच्या दर्शनासाठी या ठिकाणी आले होते.त्यांनी प्रति पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या नंदवाळ वारीमध्ये विठुरायाचे अभंग म्हणत उपस्थित भाविकांना रममाण केले.यातून पून्हा एकदा हिंदू मुस्लीम ऐक्याचे दर्शन घडले.
Jalgaon Live: भुसावळमध्ये राज्यमंत्री रक्षा खडसेंच्या नेतृत्वात २,००० अधिक झाडांची लागवडजळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे "एक पेड माँ के नाम २.०" या उपक्रमांतर्गत केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंच्या नेतृत्वात २,००० पेक्षा अधिक झाडांची लागवड करण्यात आली आहे.
Washim Weather Live: वाशिम जिल्ह्याला तीन दिवस मुसळधार पावसाचा इशाराआज दुपारपासून वाशिम जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली आहे. या जिल्ह्यात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. अतिवृष्टी झाल्यास नदी नाल्यांना पूर येण्याची शक्यता वर्तवली असून प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्यास सांगितले आहे.
Live: “त्रिभुवन” सहकारी विद्यापीठाचे भूमिपूजन केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्तेकेंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते “त्रिभुवन” सहकारी विद्यापीठाचे भूमिपूजन भारतातील पहिले सहकारी विद्यापीठ!
Live: ब्राझीलमधील भारतीयांचा पंतप्रधान मोदींना आत्मीय स्वागताने सन्मानपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्राझीलमधील भारतीय समुदायाकडून झालेल्या उत्साही आणि आत्मीय स्वागताबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
Solapur Live: जानकी नगर परिसरातील अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्थाजुळे सोलापूर परिसरातील जानकी नगर येथील रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस खराब होत चालली आहे. विशेषतः दावत चौक ते कुसुमराज मंगल कार्यालय दरम्यानचा रस्ता अत्यंत खराब स्थितीत आहे.
ओम गर्जना चौकाकडे जाणारा मार्गही अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिला असून त्याची दुरुस्ती अद्याप झालेली नाही. पावसाळ्यात या रस्त्यांवर खड्डे आणि चिखलामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.
या भागातील सर्व अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण तातडीने करण्यात यावे, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
Live: 22 देशांतून 18,000 किलोमीटरचा प्रवास करून 70 दिवसांत पंढरीची वारी लंडनमध्ये पोहोचलीपंढरपूरहून विठ्ठल-रुक्मिणींच्या पादुका घेऊन पंढरीची वारी थेट लंडनपर्यंत पोहोचली आहे. लंडनमध्ये राहणाऱ्या अनिल खेडकर यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर ते लंडन ही वारी सुरू करण्यात आली.
भारतातून लंडनमध्ये रहाणाऱ्या समुदायाने 14 एप्रिल रोजी पंढरपूरहून पांडुरंगाच्या पादुका घेऊन ही वारी निघवली. ही वारी 70 दिवसांत आशिया आणि युरोप या दोन खंडांतून 22 देशांमध्ये प्रवास करत 22 जून 2025 रोजी लंडनमध्ये पोहोचली.
लंडनमधील टॉवर ब्रिजच्या जवळ भारतीयांनी पारंपरिक रीतीने या वारीचे स्वागत केले. या वेळी हरिनामाचा जयघोष करण्यात आला आणि ढोल पथक तसेच भगवी पताकांसह वारकरी उपस्थित होते.
Live : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून'; पतीला फाशीची शिक्षा, मेहुणीलाही जीवे मारण्याचा प्रयत्नचारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून, तसेच मेहुणीला जीवे मारण्याचा प्रयत्न केलेल्या वाघजाईवाडी (ता. वाई) येथील आरोपी पतीला वाईचे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश आर. एन. मेहेरे यांनी मरेपर्यंत फाशी आणि जन्मठेप अशी शिक्षा सुनावली. अरुण परबती बिरामणे (वय ३७, रा. वाघजाईवाडी, ता. वाई) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने २२ नोहेंबर २०१६ रोजी सकाळी साडेचार वाजता चारित्र्याचा संशय घेऊन पत्नी नीलम बिरामणे हिचा धारदार शस्त्राने वार करून खून केला. या वेळी मेहुणी वर्षा जाधव ही बहिणीला सोडवण्यास गेली असता तिच्यावरही वार करून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याबाबतचा गुन्हा वाई पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला होता.
Live : चहासाठी थांबले अन् पोलिसांनी पकडले; स्कॉर्पिओतून तलवारी व चॉपर जप्तधुळ्याहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या दोघा सराईत गुन्हेगारांची स्कॉर्पिओ चहाचे दोन घोट पिण्यासाठी थांबले असता, गस्तीवर असलेल्या दोघा अंमलदारांनी संशयावरून स्कॉर्पिओची झडती घेतली. त्या वेळी धारदार तलवारीसह दोन चॉपर आढळून आले. दोघा संशयितांना ताब्यात घेत चौकशी केली असता, यातील एक संशयित धुळ्यातील सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले. सदर कारवाई शहर गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती गुन्हेशाखेने केली.
Nashik Live : पाण्यात अडकलेल्या तरुणाची रेस्क्यू टीमने केली सुटकानाशिकमध्ये पाण्याचा विसर्ग वाढल्याने रामकुंडात रात्री तरुण अडकला. पाण्यात अडकलेल्या तरुणाने तब्बल अर्धा तास सिमेंटच्या खांबाचा आधार घेतला होता. स्थानिक तरुण आणि रेस्क्यू टीमने त्याची सुटका केली. गंगापूर धरणातून विसर्ग वाढवल्याने हा तरुण अडकला होता.
Dharashiv Live : वारीतून दोनच दिवसांपूर्वी आलेल्या वारकऱ्याने केली आत्महत्याधाराशिव तालुक्यातील वाघोली गावातील काकासाहेब खडके यांनी गळफास घेऊन आयुष्य संपवलं. मुलाविरोधातील सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यात पोलिसांनी त्रास दिल्यामुळे त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं. त्यांचा मुलगा धीरज विरुद्ध बार्शी पोलिसात गुन्हा दाखल आहे.
Nashik Live : पंचवटीमध्ये मुसळधार पावसानंतर गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ.पंचवटीमध्ये मुसळधार पावसानंतर गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे
kalyan Live : आषाढी एकादशी निमित्तानं कल्याण इथल्या बिर्ला महाविद्यालयात ज्ञान दिंडी सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सहभागआषाढी एकादशीच्या निमित्तानं कल्याण इथल्या बिर्ला महाविद्यालयात ज्ञान दिंडी सोहळ्याचं आयोजन. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
आषाढी एकादशी निमित्ताने नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील शेतकरी कैलास उगले व कल्पना उगले यांना पंढरपुरात शासकीय महापूजेचा मान मिळाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उगले दाम्पत्यांनी सपत्नीक पांडुरंगाची महापूजा केली. शेतकरी कुटुंब असलेले कैलास उगले हे गेल्या १२ ते १५ वर्षांपासून ही वारकरी नियमित पंढरपूरला वारीला जातात. पांडुरंगाच्या शासकीय पूजेचा मान मिळाल्याने कैलास उगले यांच्या कुटुंबीयांसह जातेगाव येथील ग्रामस्थ देखील सुखावले आहे.
Ahilyanagar Live Updates: भंडारदरा परिसरात पावसाची बॅटिंग; पर्यटक लुटताय आनंदअहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारदरा परिसरात पावसाची बॅटिंग सुरूच आहे. सततच्या पावसामुळे निसर्गाने कात टाकली असून निसर्गाने हिरवा शालू परिधान केला आहे. भंडारदरा धरणातून प्रवरा नदीपात्रात विसर्ग सुरू असून परिसरातील छोटे मोठे धबधबे प्रवाहित झाले आहेत. पर्यटकांची पावले भंडारदरा परिसराकडे वळत असून पर्यटक पर्यटनाचा आनंद लुटताय. सततच्या पावसाने भात खाचरे देखील ओसंडून वाहत आहेत. भंडारदरा परिसरात हिरवाईने नटलेल्या निसर्गाचे मनमोहक रूप बघायला मिळतय.
Nashik Live : नाशिकच्या सोमेश्वर धबधब्यावर पर्यटनास बंदीनाशिकच्या सोमेश्वर धबधब्यावर पर्यटकांना मज्जाव
- गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग केल्याने पाणी पातळीत वाढ
- रविवार असल्याने आज पर्यटकांकडून धबधबा परिसरात केली जात आहे गर्दी
- अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात
- स्थानिक पोलिसांचं गृह रक्षक दलाचे जवानही तैनात
Ratnagiri Live: लांजा तालुक्यातील खोरनीनको धबधबा प्रवाहितधरणाची रचना अशी आहे कि त्यातून हे मानवनिर्मीत धबधबे निर्माण झालेत
धरण आणि तिथंला धबधबा असा दुहेरी संगम
पावसाळ्यात धरण भरलं की धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागतं
त्यानंतर टप्प्याटप्प्याने पडणारा खोरनिनकोचा हा मानवनिर्मित सुंदर धबधबा भान हरपून टाकतो
यावर्षी जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच खोरनीनकोचे धरण भरलं
Mumbai Live Update: ठाण्यात मुसळधार पावसामुळे झाडे कोसळलीठाण्यात मुसळधार पावसामुळे झाडे कोसळली आहे.
PM Modi Live Update: अर्जेंटिनाचा यशस्वी दौऱ्यानंतर , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्राझीलची राजधानी रिओ दि जनेरियो इथं भव्य स्वागतसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू डॉ. शं. ना. नवलगुंदकर यांचे दुःखद निधन झाल्याची माहिती समोर आली आहे.
Mumbai Live : हिंदीविरोधातील स्टॅलिन यांच्या लढ्याला आमच्या शुभेच्छा - संजय राऊतहिंदीविरोधातील स्टॅलिन यांच्या लढ्याला आमच्या शुभेच्छा आहे, असं खासदार संजय राऊत म्हणाले.
वसई विरार शहरात आज सकाळपासूनच पावसाची दमदार बॅटिंग सुरू झाली आहे. यामुळे शहराच्या सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.
साचलेल्या पाण्यातून वाहन चालकांना आपली वाहने चालवावी लागत आहेत मात्र पाण्यात खड्यांचा अंदाज येत नसल्यामुळें अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
Sindhudurg Live : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज पावसाचा येलो अलर्टसिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून अधूनमधून पावसाच्या सरी कोसळताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात कुठेच पाणी साचल्याच्या घटना घडलेल्या नाहीत. दरम्यान गेल्या 24 तासात जिल्ह्यात सरासरी 52 मिमी पाऊस झाला असून सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक 105 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
Navi Mumbai Live : नवी मुंबईच्या महायुतीतून अजित पवार गट बाहेर पडण्याची शक्यतामहायुतीतून बाहेर पडण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. अजित पवार गटाची नवी मुंबई शहरांमध्ये बैठक पार पडली बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची महिती आहे.
Maharashtra Live : मुंबई गुजरातची राजधानी होती - प्रतापराव जाधवशिवसेना अध्यक्ष, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यात जय गुजरात म्हटल्यानंतर महाराष्ट्रात गदारोळ उडाला होता. हा वाद शांत होतो ना होतो तोच आता शिवसेना खासदार आणि केंद्रीय मंत्री प्रताप जाधव यांच्या वक्तव्याने वाद उफाळण्याची शक्यता आहे.
Mumbai Live : मुंबईत पावसाची संततधार सुरुराज्यात पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली असून मुंबईत सकाळपासून पावसाची संततधार सुरु आहे. अनेक सखल भागांत पाणी साठले आहे.