सोन्याच्या दरात पुन्हा घसरण! 10 ग्रॅममागे ‘एवढा’ दर, खरेदीसाठी योग्य वेळ कोणती? 7 जुलै रोजी…
Marathi July 07, 2025 05:25 PM

आज सोन्याची किंमत: अमेरिकेच्या व्यापार करारांबाबत सकारात्मक हालचाली आणि टॅरिफच्या मुदतीत झालेला बदल यामुळे आज सोमवार, 7 जुलै 2025 रोजी देशभरात सोन्याच्या दरात घट झाली आहे. सोन्याचे दर आठवडाभरात पुन्हा एकदा तेजी पाहायला मिळाली. काल सोन्याच्या व्यवहारांमध्ये काहीशी वाढ झाल्यानंतर आज पुन्हा सोन्याच्या दरात घसरण झाली आहे.  आज 24 कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅम 96,800 रुपयांना, तर 22 कॅरेट सोने 88,733 रुपयांना विकले जात आहे. (Gold Prices Today)

सातत्यानं बदलणाऱ्या सोन्याच्या दरामुळे खरेदीदारांमध्ये अजून संभ्रमावस्था आहे. सोन्याप्रमाणं चांदीचे दर आठवड्याच्या आधारे 2200 रुपयांनी वाढले आहेत. 6 जुलै रोजी चांदीचा दर 110000 रुपये प्रतिकिलो इतका आहे. इंदौरच्या सराफ बाजारात चांदीचे दर 5 जुलै रोजी 200 रुपयांनी कमी झाले.

सोन्याचांदीचे दर किती?

देशातल्या मोठ्या शहरांमध्येही आज सोन्याच्या किंमती खाली आल्या आहेत. दिल्ली, मुंबई, पुणेकोलकाता, बेंगळुरू या शहरांमध्येही 24 कॅरेट सोने जवळपास  96,720 ते 98,900 रुपयांच्या आसपास आणि 22 कॅरेट सोने 88,660 ते 90,700 रुपयांदरम्यान विकले जात आहे. केवळ भारतातच नाही तर जागतिक बाजारातही आज सोनं स्वस्त झालं आहे.

आंतरराष्ट्रीय घडामोडींचा सोन्याचांदीच्या दरावर परिणाम

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या संकेतांनुसार, अमेरिकेचे अनेक देशांशी चाललेले व्यापार करार अंतिम टप्प्यात आहेत. एप्रिल महिन्यात अमेरिकेने 10 टक्के बेस टॅरिफ लावले होते आणि 50 टक्क्यांपर्यंत अतिरिक्त सीमा शुल्कही आकारले होते. ही टॅरिफ 9 जुलै रोजी संपत आहे. यानंतर 1 ऑगस्टपासून व्यापार करार न झालेल्या देशांवर नव्याने टॅरिफ आकारले जाणार आहेत. या घडामोडींमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात अनिश्चितता वाढली असून त्याचा थेट परिणाम सोनेाच्या दरांवर झाला आहे.

जुलै ते डिसेंबरदरम्यान सोन्याचे दर कसे असतील?

आयसीआयसीआय ग्लोबल मार्केटसनं सांगितलं की या वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत म्हणजेच जुलै ते डिसेंबरमध्ये सोन्याच्या दरात तेजी पाहायला मिळेल. या आठवड्याच्या शेवटीपर्यंत एक तोळे सोन्याचा दर 1 लाखांच्यावर जातील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सोन्याचे दर शॉर्ट टर्म साठी 96500 रुपयांपासून वाढण्यास सुरुवात होईल. त्यानंतर सोन्याचे दर 1 लाख रुपयांच्या पार जातील, अशी शक्यता आहे. भारतासारख्या देशात लग्नकार्य, सण-उत्सव, पूजाअर्चा या सगळ्यात सोन्याचं स्थान खास असतं. शिवाय गुंतवणुकीच्या दृष्टीनेही सोनं नेहमीच फायदेशीर मानलं जातं. त्यामुळे दर कमी झाले की सोनं खरेदी करायला सुरुवात होते, आणि त्याच वेळी घरखर्च करणाऱ्यांसाठीही हा एक छोटासा दिलासा ठरतो.

हेही वाचा

Bank Jobs : सरकारी बँकांमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, वर्षभरात 50 हजार जागा भरण्याची शक्यता, सर्वाधिक जागा कोणती बँक भरणार?

आणखी वाचा

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.