Maruti Suzuki Alto on Discount : दारी चारचाकी असावी असे प्रत्येकाचे स्वप्न असते. सध्याच्या घडीला भारतीय बाजाराचा विचार करता सर्वात स्वस्त कारमध्ये मारुती सुझुकी ऑल्टो K10 कारचे नाव सर्वात टॉपवर आहे.जर तुम्हाला दररोज ऑफीस ये-जा करायची असेल तर जास्त मायलेज देणारी ही कार सर्वात स्वस्त आहे. जर तुम्ही मारुती सुझुकी ऑल्टो K10 कार खरेदी करु इच्छीत असाल तर मारुतीने या महिन्यात ऑल्टो कारवर बंपर डिस्काऊंट ऑफर दिली आहे.
दिल्ली – एनसीआरच्या स्थानिय डिलरशिपच्या मते ऑल्टो च्या पेट्रोल म्यॅन्युअर व्हेरीएंटवर 62 हजार 500 रुपयांची तर ऑटोमेटिक व्हेरीएंटवर 67 हजार 500 रुपये आणि सीएनजी ( मॅन्युअल ) वेरिएंटवर 62 हजार 500 रुपयांपर्यंत सुट मिळाली आहे. गाडीत कॅश डिस्काऊंट शिवाय एक्सचेंज ऑफर्स आणि कॉर्पोरेट ऑफर्सचा समावेश आहे.
मारुती सुझुकी ऑल्टो K10 ची एक्स- शोरुम किंमत 4 लाख 23 हजार रुपयांपासून सुरु होते. आणि टॉप मॉडेलसाठी ही किंमत 6 लाख 21 हजार रुपये आहे. याच्या LXi S-CNG वेरिएंटची किंमत 5 लाख 90 हजार रुपये एक्स शोरुम आहे.
मारुती सुझुकी ऑल्टो K10 मध्ये कंपनीने 1.0 लिटरचे 3 सिलेंडरवाले इंजिन दिले आहे. हे इंजिन 66 बीएचपीचे मॅक्स पॉवर जनरेट करते. आणि 89 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते. यासह यास 5 – स्पीड मॅन्युअल वा एएमटी गिअरबॉक्ससह कनेक्ट केलेले आहे.
या कारमध्ये सीएनजीचा देखील पर्याय दिला जात आहे. कंपनीच्या मते या कंपनीच्या पेट्रोल व्हेरिएंट सुमारे 25 किमी प्रति लिटर मायलेज देते. तर या कारचे सीएनजी व्हेरिएंट 33 किमीपर्यंतचे मायलेज देण्यास सक्षम आहे.
मारुती सुझुकीच्या कारचे फिचर्स पाहाता या कंपनीने या कारमध्ये एसी, फ्रंट पॉवर विण्डो, पार्किंग सेंसॉर, सेंट्रल कंसोल आर्मरेस्ट, गिअर शिफ्ट इंडिकेटर, एडजस्टेबल हेडलँप, हॅलोजन हँडलँप, एंटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम, सेंट्रल लॉकिंग, चाईल्ड सेफ्टी लॉक्स, ड्युअल एअर बॅग सारखे चांगले फिचर्स दिलेले आहेत.