भोसरी, ता. ८ ः पुणे - नाशिक महामार्गाच्या सेवा रस्त्यावर भोसरी-आळंदी रस्ता चौकात चक्रपाणी वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्याजवळ वाहनांची गर्दी होत आहे. वाहतूक सुरळीत असताना काही वाहने चौकातून उलट दिशेने बीआरटीएस टर्मिनलकडे मोशीकडे जाण्यासाठी वळत असल्याने रहदारीला अडथळा झाल्याचे दिसून आले.
पीएमपी बस दोन मार्गिकेमध्ये लावण्यात आल्याने इतर वाहनांना ये-जा करण्यासाठी एकच मार्गिका खुली होती. आळंदी रस्त्यावर विविध कारणांनी कोंडी होत असून त्याचा परिणाम महामार्गावर होताना दिसतो.
मुख्य कारणे
- चक्रपाणी वसाहतीजवळील अरुंद रस्त्यावर एसटी थांबणे
- आळंदी रस्त्यावर होणारी वाहनांची कोंडी
- वर्दळीच्या रस्त्यातच खासगी ट्रॅव्हल्ससह इतर वाहने उभी करणे
उपाय काय ?
- सेवा रस्त्यावर नो पार्किंग झोन करणे
- खासगी ट्रॅव्हल्स, रिक्षांना रस्त्यात थांबण्यास मज्जाव करणे
- आळंदी रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी उपाययोजना करणे
आळंदी रस्ता चौकातील बीआरटीएस टर्मिनलजवळ रिक्षा अस्ताव्यस्त लावल्या जातात. पीएमपी बसही दोन मार्गिकेमध्ये लावल्या जातात. शिवाय चक्रपाणी वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्यावर एसटी, खासगी बस थांबत असल्याने वाहतूक कोंडी होत आहे.
- साहिल सावंत, वाहन चालक