Maharashtra Live News Update : अकरावीच्या दुसऱ्या फेरीची निवड यादी १७ जुलैला होणार जाहीर
Saam TV July 09, 2025 01:45 AM
जालना शहरातील भोकरदन नाका परिसरात 2 चोरट्यांनी दुकान फोडले; 33 हजारांचा मुद्देमाल केला लंपास

जालना शहरातील भोकरद नाका परिसरातील दोन दुकानात चोरट्यांनी चोरी केली आहे.चोरी करतानाची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.जालना शहरातील भोकरदन नाका पोलिस चौकीपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या 2 दुकाना चोरट्यांनी फोडल्याचा घटना समोर आल्या.यामध्ये 33 हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला असून दुकानाचे शटर उचकटून हे चोरटे आत शिरताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.दरम्यान या प्रकरणी व्यापाऱ्याने दिलेल्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

उजनी धरणातून 10 हजार क्युसेक विसर्ग सोडणार

उजनी धरणात येणार्या विसर्ग वाढला आहे. त्यामुळे धरण सुमारे 88 टक्के भरले आहे. पूर नियंत्रणासाठी आज सकाळी 10 वाजले पासून पुन्हा भिमा नदी पात्रात 10 हजार क्युसेक इतका विसर्ग सोडला जाणार आहे.मध्यंतरी आषाढी यात्रेमुळे भीमा नदी पात्रातील विसर्ग पूर्ण बंद केला होता. दरम्यान पुणे जिल्ह्यात पाऊस सुरू झाल्याने धरणात 20 हजाराहून विसर्ग येत आहे. धरणातील पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी भीमा नदी पात्रात विसर्ग सुरू केला जाणार . नदी काठच्या गावातील नागरिक सतर्क राहावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

अमरावती शहरात बॉम्ब असल्याची केवळ अफवाच

अमरावती शहरातील प्रभात टॉकीज परिसर मध्ये बॉम्ब आहे, असा फोन अमरावती शहराच्या कंट्रोल रूम पोलिसांना आला त्यामुळे लागलीच बॉम्ब असल्याच्या बातमीने पोलीस वर्तुळात खळबळ उडाली,एका अज्ञात इसमाने पोलीस कंट्रोल रूमला कॉल करून सरोज टॉकीज परिसरामध्ये बॉम्ब असल्याचा फोन होता,त्यामुळे अमरावती शहर पोलिसांनी या फोनची गंभीर दखल घेतली,घटनास्थळी बॉम्ब शोध पथकाने शोध मोहीम सुरू केली मात्र त्या ठिकाणी काहीच आढळून आले नाही.. यावेळी घटनास्थळी एसिपी, सिटी कोतवालीचे पोलीस निरीक्षक व श्वानपथकाने पाहणी कसून पाहणी केली आणी सरोज टॉकीज परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवला, मात्र सर्वत्र शोधाशोध केली या ठिकाणी काही मिळून आलेलं नाही, परंतु या फोनमुळे पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली होती, तर ज्या नंबर वरून फोन आला तो नंबर आता बंद असून त्या इसमाचा शोध अमरावती शहर पोलीस घेत आहे, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन करण्यात आले

धाराशिव जिल्ह्यात पुढील तीन दिवस हलका पाऊस पडण्याची शक्यता

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्ट्यामुळे गत काही दिवसांपासून संथ वाटचाल करत असलेल्या पावसाला पुन्हा एखदा गती आली आहे.धाराशिव जिल्ह्यात सोमवारी दुपारी पाऊस झाल्याने पिकांना दिलासा मिळाला आहे.पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती परंतु आता जिल्ह्यात दि.8 ते 10 जुलै पर्यंत हलका पाऊस पडेल त्यानंतर 11 ते 16 जुलै पर्यंत खंड राहणार त्यानंतर पुन्हा 18 ते 26 जुलै पर्यंत चांगला पाऊस पडेल असा अंदाज हवामान अभ्यासक सुरज जाधव यांनी व्यक्त केला आहे.

अजित पवारांनी केलेल्या गद्दारीची जयंत पाटील यांनी शरद पवारांना करून दिली आठवण

निवडणूकीतील पराभवावर बोलताना जयंत पाटील यांनी अजित पवार यांनी केलेल्या गद्दारीची आठवण शरद पवार यांना करून दिली. संघटनेमध्ये लोकांपेक्षा आपल्याच लोकांवर लक्ष ठेवण्याची वेळ आता आली असल्याच सांगताना कार्यकर्त्यांमध्ये एक नासका आंबा आला की तो सर्वांना बघडवतो अस उदाहण देखील जयंत पाटील यांनी या वेळी दिल.

Maharashtra Live News Update : अकरावीच्या दुसऱ्या फेरीची निवड यादी १७ जुलैला होणार जाहीर

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने अकरावीच्या प्रवेशातील दुसऱ्या फेरी सोमवारी जाहीर केली आहे

यानुसार, केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतील दुसऱ्या प्रवेश फेरीतील प्रवेशासाठी नवीन विद्यार्थी नोंदणी आणि अर्जाचा भाग एकमध्ये दुरुस्ती करणे, विद्यार्थी त्यांच्या प्राधान्यक्रमाच्या यादीत किमान एक ते कमाल दहा उच्च माध्यमिक विद्यालयांचा समावेश करता येणार आहे

नियमित फेरी एकमध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुढील फेरीत प्रवेश आणि पसंतीक्रम अद्ययावत करण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे

याच वेळी कोट्याअंतर्गत प्रवेश प्रकिया सुरू असणार आहे.

पुणे महापालिकेच्या तिजोरीत १४०० कोटीचा कर जमा

गेले दोन महिने निवासी मिळकतकरावर ५ ते १० टक्के सवलत देण्यात आली होत

अखेरच्या दिवशी सायंकाळी सात पर्यंत ७ लाख ७५ हजार १४० मिळकतधारकांनी १४११ कोटी रुपये महापालिकेच्या तिजोरीत जमा केले आहेत

गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल ३ हजार ३७६ नागरिकांनी कर भरणा केलेला नाही

महापालिकेला अपेक्षित उत्पन्नाला लागली आहोटी

गेल्यावर्षी ७ जुलैपर्यंत ७ लाख ७८ हजार ५१६ नागरिकांनी १ हजार ४१५ कोटी ६५ लाख रुपयांचा कर जमा केला होता

यंदाच्या वर्षी सायंकाळी सातपर्यंत १ हजार ४११ कोटी रुपये जमा झाले आहे

महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना प्रकरणातील आरोपीकडून न्यायालयाचा अपमान

आरोपीने न्यायालयात असभ्य भाषा वापरून केला न्यायलाचा अवमान

न्यायालयाचा अवमान करणाऱ्या आरोपीस न्यायालयाने एक हजार रुपये दंड आणि सात दिवस कारावासाची सुनावली शिक्षा

सूरज आनंद शुक्ला असे पुतळ्याची विटंबना आणि न्यायालयाचा अवमान करणाऱ्या आरोपीचे नाव आहे

रविवारी पुणे रेल्वे स्थानकात महात्मा गांधींच्या पुतळ्यावर चढून त्याने धारदार हत्याराने पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न केला

मात्र, घटनास्थळी तैनात असलेल्या पोलिसांनी प्रसंगावधान राखत त्याला लगेच ताब्यात घेतले.

शुक्लाला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले यावेळी न्यायालयाने त्यास ‘पोलिसांच्या विरोधात काही तक्रार आहे का? किंवा तुम्हाला काही सांगायचे आहे का? अशी विचारणा केली. त्यानंतर आरोपीने न्यायालयाचा अपमान होईल अशी भाषा केली

पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये गेल्या वर्षी च्या तुलनेत तीन पट पाणीसाठा जास्त

चार ही धरणे मिळून ६७ टक्के पाणीसाठा

गेल्या वर्षी आजच्या तारखेला २३ टक्के पाणीसाठा होता

पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरूच

सकाळी खडकवासला धरणातून ४ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू

खडकवासला, वरसगाव ,पानशेत आणि टेमघर या चार धरणात एकूण ६६ टक्के पाणीसाठा

तर पुणे शहराचा जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट

कुठल्या धरणात किती पाणीसाठा

खडकवासला: ६२.१७ टक्के

पानशेत: ६५.८९ टक्के

वरसगाव: ७१.२८ टक्के

टेमघर: ५८.६० टक्के

एकूण पाणीसाठा: ६७.०८ टक्के

पुणे आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील मत्स्यव्यावसायिकांचा शनिवारी सन्मान सोहळा

राष्ट्रीय मत्स्यशेतकरी दिनाचे औचित्य साधून केंद्र व राज्य शासनाच्या मत्स्यव्यवसाय विषयक विविध योजनांची जनजागृती कार्यक्रम

पुणे व छत्रपती संभाजीनगर द्विविभागस्तरीय मत्स्यव्यावसायिकांचा सन्मान सोहळा

१२ जुलै रोजी पुण्यातील कृषी महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आला सोहळा

मत्स्यबीज उत्पादन, मासेमारी, मत्स्यशेती, केज कल्चर, बायोफ्लॉक कल्चर, शोभिवंत मत्स्यव्यवसाय, नाविन्यपूर्ण मत्स्यउद्योजक, रिव्हर रँन्चिग, मत्स्यपर्यटन प्रचार-प्रसार या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करणारे आदींना प्रशस्तीपत्रक व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार

मत्स्यव्यवसायाला कृषीचा दर्जा मिळाल्यामुळे होणाऱ्या फायद्यांबाबत जनजागृती करण्यात येणार

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.