'मनसे कार्यकर्त्यांनी टॅक्सी-रिक्षाचालकांना मारहाण केली, काही ठिकाणी हत्याही झाल्या'; गंभीर आरोप करत अबू आझमींचा जोरदार हल्ला
esakal July 09, 2025 02:45 AM

Mira Bhayandar MNS Morcha : मीरा-भाईंदर शहरात सध्या मराठी विरुद्ध अमराठी वाद पुन्हा एकदा तापलेला असून, या पार्श्वभूमीवर मनसे (MNS) आणि हिंदी भाषिक व्यापाऱ्यांमध्ये सुरू झालेल्या आंदोलनांमुळे वातावरण तणावपूर्ण बनले आहे.

हिंसाचाराच्या निषेधार्थ अमराठी व्यापाऱ्यांचा मोर्चा

२ जुलै रोजी मनसेच्या एका कार्यकर्त्याने हिंदी भाषिक दुकानदाराला मारहाण केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ, हजारो अमराठी व्यापाऱ्यांनी मोठा मोर्चा काढला होता. या मोर्चाला भाजपकडून (BJP) अप्रत्यक्ष पाठिंबा असल्याचे आरोप करण्यात आले.

MNS Mira Bhayandar Morcha : 'परप्रांतीयांनी मोर्चा काढला, त्यांचा हेतू वाईट नव्हता, पण मनसेचा..'; आमदार मेहतांच्या वक्तव्यामुळे वादाची शक्यता! मनसेचा प्रत्युत्तरात्मक मोर्चा आणि पोलिसांची कारवाई

या घटनेच्या पार्श्वभूमीवर मनसेने आज ८ जुलै रोजी बालाजी हॉटेलपासून मीरा रोड रेल्वे स्थानकापर्यंत मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला. मात्र, पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारत मनसे नेत्यांना नोटिसा पाठवल्या. प्रमुख नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि काही कार्यकर्त्यांना मोर्चा स्थळी अटक केली. त्यानंतरही काही वेळाने मनसेचा मोर्चा निघाला.

MNS Mira bhayandar Morcha: मराठी मोर्चाला पोलिसांचा अडथळा? गुजराती-मारवाडींची चिथावणी; मीरा-भाईंदरमध्ये काय घडलं? 'मनसे कायद्यावर विश्वास ठेवत नाही'

या पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी (Abu Azmi) यांनी मनसेवर जोरदार टीका केली. त्यांनी म्हटले, "मनसेचे कार्यकर्ते वारंवार कायद्याची पायमल्ली करत आहेत. यापूर्वीही त्यांनी रिक्षाचालक, टॅक्सीचालकांवर हल्ले केले. काही ठिकाणी हत्या देखील झाल्या. मात्र, आजवर कोणतीही कठोर कारवाई झाली नाही."

आझमी पुढे म्हणाले, "मीरा रोडच्या घटनेत दुकानदार सुदैवाने सामर्थ्यशाली होता, म्हणून तो वाचला. “सरकारने पाहावे, खरा अपमान मराठीचा कोण करत आहे आणि दोषींवरच कायदा लावावा," त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडेही याबाबत कठोर भूमिकेची विनंती केली.

MNS Mira bhayandar Morcha: हिंदी भाषिकांच्या मोर्चाला परवानगी मग मनसेला का नाही? देवेंद्र फडणवीसांनी दिले स्पष्टीकरण... प्रताप सरनाईक यांचं पोलिसांना थेट आव्हान

दरम्यान, कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केल्यावर, शिवसेना शिंदे गटाचे नेते व आमदार प्रताप सरनाईक आक्रमक झाले. त्यांनी म्हटले, "शांततेच्या मार्गाने मोर्चा निघाला होता, तरी पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. मराठी एकीकरण समितीच्या नेत्यांनाही परवानगी नाकारण्यात आली. पोलीस आयुक्तांविरोधात मी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे." सरनाईक पुढे म्हणाले, “मी स्वतः मोर्चात सहभागी होतोय. पोलिसांनी मला अडवून दाखवावं," असे थेट आव्हानही त्यांनी पोलिसांना दिले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.