अखेर छांगूर बाबाला अटक करण्यात आली. त्यानंतर त्याच्या कोठीवरही बुलडोझर फिरवण्यात आला आहे. उत्तर प्रदेशातील बलरामपूरमद्ये छांगूर बाबाच्या नावानने जलालुद्दीन प्रसिद्ध होता. त्याने तिथेच त्याची कोठी तयार करून अवैध धंदे सुरू केले होते. जबरदस्तीने धर्मांतर करायचा. त्याचा पर्दाफाश झाल्याने पोलिसांनी त्याला अटक केली. त्यानंतर छांगूरच्या कोठीला नोटीस चिपकवून सात दिवसाची डेडलाईन दिली. अखेर आज ही कोठी जमीनदोस्त करण्यात आली आहे.
बलरामपूरच्या उतरौलामध्ये ही कोठी होती. ही कोठी बेकायदेशीर होती. त्यामुळे ती हटवण्याची नोटिस चिपकवण्यात आली होती. ही बेकायदेशीर कोठी हटवली नाही तर बुलडोझर चालवला जाईल. सात दिवसाची डेडलाईन देण्यात येत आहे. असं या नोटिशीत म्हटलं होतं. ही कोठी ग्रामसभेच्या जमिनीवर असल्याने ही नोटीस देण्यात आली होती. तहसीलचे अधिकारी आणि पोलिसांनी मधपूर गावात येऊन छांगूरच्या कोठीला नोटीस चिपकवली होती.
जात पाहून मुलींचे रेट…
यूपी एटीएसने नुकतेच छांगूर बाबा आणि त्याची सहकारी नीतू ऊर्फ नसरीनला बलरामपूर येथून अटक करण्यात आली. त्यानंतर अवैध धर्मांतराच्या नेटवर्कचा पर्दाफाश झाला. छांगूर बाबा गरीब आणि असहाय लोकांना पैशाचं प्रलोभन दाखवून त्यांचं धर्मांतर करायचा. खास करून हिंदू मुलींना तो टार्गेट करायचा. तो वेगवेगळ्या जातीच्या मुलींचे वेगवेगळे रेट ठरवायचा. ब्राह्मण आणि क्षत्रिय मुलींचा रेट 15 ते 16 लाख रूपये असायचा. त्यासाठी परदेशातून 100 कोटी रुपयांचा फंडिंग यायचा, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मुंबईपासून बलरामपूरपर्यंत…
एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, छांगूरचं मुंबईशीही कनेक्शन होतं. मुंबईतील नवीन रोहरा आणि त्याची बायको नीतूला आपल्या जाळ्यात अडकवून त्यांचीह धर्मांतर घडवून आणलं होतं. त्यांना बलरामपूरला आणण्यात आलं. नीतूला नसरीन आणि नवीनला जमालुद्दीन नावाने ओळखलं जाऊ लागलं. नवीनला 8 एप्रिल रोजी अटक करण्यात आली होती. त्याची चौकशी केली असता छांगूरने एक वर्षात विदेशातून फंडिंग मिळवून कोट्यवधीची संपत्ती जमवली आहे. त्यात शोरूम, बंगले आणि लक्झरी गाड्यांचा समावेश आहे.
कोर्टाच्या क्लर्कची बायको…
उतरौलाच्या एका न्यायालयातील क्लर्क राजेश उपाध्यायशीही छांगूरचं कनेक्शन असल्याचं समोर आलं आहे. जमिनीच्या खरेदी विक्रीवरून छांगूर आणि अहमद नावाच्या व्यक्तीमध्ये वर्चस्वाची लढाई होती. या काळात छांगूरची भेट लिपिक राजेशशी झाली. राजेशने त्याचा खटला चालवण्यासाठी मोठी मदत केली होती.
त्यानंतर पुण्यातील 16 कोटी रुपयांच्या जमिनीच्या खरेदी करारात राजेशची पत्नी संगीताला भागिदार करण्यात आलं होतं. यात नफ्यातील वाटा देण्याचंही आश्वासन होतं. पण राजेशने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यानंतरही एटीएसने राजेश आणि त्याच्या पत्नीला आरोपी बनवलं आहे. त्यांची चौकशी लवकरच होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.