सिडको- त्रिमूर्ती चौक परिसरात वादातून एका ६५ वर्षीय वृद्धाचा डोक्यात लाकडी दांडक्याने खून केल्याची घटना मंगळवारी (ता. ८) दुपारच्या सुमारास घडली. या खुनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणपत चंदर गारे (वय ६५, रा. उंटवाडी) असे मृत व्यक्तीचे नाव असून, सर्मोद कोल (वय ३५, रा. मुळगाव, मध्यप्रदेश) यास अंबड पोलिसांनी अटक केली आहे. विशाल देशी बारसमोर दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला.
प्रारंभी गारे यांनी लाकडी दांडक्याने सर्मोद कोल यास मारहाण केली. संतापलेल्या अवस्थेत कोल याने प्रतिउत्तरात गारे यांच्या डोक्यात दगड व लाकडाने जोरदार वार केले. यात गारे हे खाली कोसळले व काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला.
Nashik Share Market Fraud : एस. टी. ट्रेडर्स’चा मोठा घोटाळा ; ७ कोटींची गुंतवणूक फसवलीघटनास्थळी पेट्रोलिंग करत असलेले गुन्हे शोध पथक दाखल झाले व त्यांनी तत्काळ आरोपीला अटक केली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.