Devendra Fadnavis : ''मीसुद्धा तो व्हिडीओ बघितला, पण...''; संजय गायकवाडांनी केलेल्या मारहाणीवर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
esakal July 10, 2025 03:45 AM

MLA Sanjay Gaikwad seen in a viral video assaulting a canteen worker at MLA hostel over allegedly spoiled food : शिळं आणि वास येणारं अन्न दिल्याचा आरोप करत शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासातील कँन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केली आहे. त्याच्या एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या व्हिडीओत आमदार गायकवाड चक्क बनियान आणि लुंगी घालून कर्मचाऱ्याला मारहाण करताना दिसत आहेत. या प्रकरणाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

महत्त्वाचे म्हणजे याचे पडसाद आता विधिमंडळातही बघायला मिळाले. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी विधानपरिषदेत हा मुद्दा उपस्थित केला. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली.

Devendra Fadnavis: पर्यावरण संवर्धनाचा संदेश गावोगावी न्या: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; ‘पर्यावरणाची वारी, पंढरीच्या दारी’ उपक्रम काय म्हणाले अनिल परब?

''मुख्यमंत्री आपल्या राज्यात काय सुरु आहे. त्या खात्याच्या मंत्र्याला मारा, व्हिडिओ काढून सोशल मिडीयावर टाका, दादारीरी सुरु आहे. मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख आहेत. यावर कारवाई करणार आहात. अशा लोकांचा पाठिंबा कशाला घेता. आमदार संजय गायकवाड यांना निलंबित करता येत असेल तर निलंबित करावा'', अशी मागणी अनिल परब यांनी केली.

देवेंद्र फडणवीसांनी नेमकं काय म्हटलं?

यावर बोलताना, ''आपण सत्तेचा गैरवापर करुन नये, आमदारांबाबत चुकीची भावना जाते. सत्तेचा गैरवापर करतता, अशी भावना लोकामध्ये जाते. मी तो व्हिडीओ बघितला आहे. पण मुळात लुंगी मारो की कसेही मारो, मारहाण चुकीची आहे'', अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

''मंत्रिमंडळाची प्रतिष्ठा देखील कमी होती. आमदार निवासा डाळीला वास येतो. याची लेखी तक्रार करता येते. स्वतंत्रपणे कारवाई झाली पाहिजे, अशाप्रकराचे व्हिडिओ येण हे आपल्याला शोभत नाही'', असंही त्यांनी नमूद केलं.

Devendra Fadnavis आणि Amruta Fadnavis यांनी केली पूजा । Pandharpur news नेमकं प्रकरण काय?

संजय गायकवाड यांनी मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासातील कँटीन कर्मचाऱ्याला मारहाण केली आहे. त्यांनी मागवलेल्या जेवणात डाळीला दुर्गंधी येत असल्याचा आणि त्यामुळे उलटी झाल्याचा आरोप त्यांनी केला. यामुळे संतापलेल्या गायकवाड यांनी बनियन आणि लुंगीवर कँटीनमध्ये जाऊन कर्मचाऱ्याला जोरदार ठोसे लगावले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.