तोंडावर गोड बोलला आणि गेम केला, कॅप्टन शुबमनकडून तिसऱ्या कसोटीतून या खेळाडूचा पत्ता कट
GH News July 10, 2025 06:08 PM

भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दोन सामने पार पडले आहेत. आतापर्यंत खेळलेल्या दोन सामन्यात 1-1 अशी बरोबरी आहे. त्यामुळे तिसरा कसोटी सामना दोन्ही संघांसाठी तितकाच महत्त्वाचा आहे. दोन्ही संघांनी त्यासाठी कंबर कसली आहे. भारताने तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी संघात एक बदल केला आहे. भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची संघात एन्ट्री झाली आहे. यासाठी संघातून वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाचा पत्ता कापला आहे. प्रसिद्ध कृष्णा मागच्या दोन सामन्यात खूपच महागडा ठरला होता. एजबेस्टन कसोटीत तर त्याला विकेटही मिळाली नाही. त्यामुळे त्याला तिसऱ्या सामन्यात बसवलं जाणार हे सहाजिकच होतं. आता बुमराहसोबत आकाश दीप आणि मोहम्मद सिराज दिसणार आहे. तर रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनाही संघात स्थान देण्यात आलं आहे.

शुबमन गिल म्हणाला की, ‘आज सकाळपर्यंत मी गोंधळलेला होतो की काय करावे. मी प्रथम गोलंदाजी केली असती. पहिल्या सत्रात गोलंदाजांसाठी काहीतरी असेल. सर्वांनीच त्यात भर घातली आणि चर्चा याच विषयावर होती. गोलंदाजांना आत्मविश्वास वाटत आहे, एजबेस्टन विकेटवर 20 बळी घेणे सोपे नव्हते. मला खूप छान वाटत आहे, एक फलंदाज म्हणून तुम्ही परिस्थितीच्या मध्यभागी राहून फलंदाजी करण्याची अपेक्षा करता. आमच्याकडे एक बदल आहे. प्रसिद्धऐवजी बुमराह संघात आला आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, करुण नायर, शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (विकेटकीपर), ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, शोएब बशीर.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.