मुंबई आणि महाराष्ट्राकडे स्वतःच असं काय आहे? मुंबई आणि महाराष्ट्र तर इतरांच्या भाकरीवर जगतो. मुंबईत महाराष्ट्रात स्वतःचे उद्योग धंदे नाहीयत. खाणी नाहीयत, इतर राज्यातल्या उद्योजकांवर महाराष्ट्रात चालतो, अशी वक्तव्य करणाऱ्या खासदार निशिकांत दुबे यांचा मुंबईत स्वतःच्या मालकीचा फ्लॅट आहे. झुलेलाल अपार्टमेंट नावाच्या इमारतीत त्यांचा फ्लॅट आहे. 2009 साली राजकारणात येण्यापूर्वी खासदार निशिकांत दुबे हे मुंबई मधल्याच एका बड्या कॉर्पोरेट कंपनीमध्ये डायरेक्टर पदावरती कार्यरत होते.
या अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावर खासदार निशिकांत दुबे यांच्या मालकीचा फ्लॅट आहे. 2009 मध्ये जेव्हा निशिकांत दुबे यांनी निवडणूक लढवलेली होती, तेव्हा त्या प्रतिज्ञा पत्रामध्ये सुद्धा त्यांनी या मुंबईतल्या स्वतःच्या मालकीच्या फ्लॅटचा दाखला दिलेला आहे. या अपार्टमेंटमध्ये 404 नंबरचा फ्लॅट निशिकांत दुबे यांचा आहे, जो सध्या भाड्याने दिला आहे.
हा फ्लॅट 1680 स्क्वेअर फिटचा
झुलेला अपार्टमेंट खार वेस्टला आहे. हा फ्लॅट अतिशय उच्चभ्रू परिसरामध्ये आहे. हा फ्लॅट 1680 स्क्वेअर फिट इतका आहे आणि 2009 मध्ये प्रतिज्ञा पत्रानुसार या फ्लॅटची किंमत ही तेव्हा एक कोटी 60 लाख इतकी होती. अर्थातच आता 2025 मध्ये याची किंमत ही जवळपास दोन कोटींच्या सुद्धा पुढे गेलेली आहे.
राजकारणात येण्यापूर्वी मुंबईत काय करायचे?
इतकच नाही तर 1993 ते 2009 कार्यकाळामध्ये राजकारणात येण्यापूर्वी खासदार निशिकांत दुबे हे मुंबई मधल्याच एका बड्या कॉर्पोरेट कंपनीमध्ये डायरेक्टर पदावरती कार्यरत होते. अर्थातच व्यवस्थापकीय संचालक मंडळात ते होते.
निशिकांत दुबे काय म्हणालेले?
“तुम्ही कोणाची भाकरी खात आहात? टाटा, बिर्ला, रिलायन्सचे महाराष्ट्रात युनिट नाहीत. टाटांनी त्यांचा पहिला कारखाना बिहारमध्ये बांधला. तुम्ही आमच्या पैशावर जगत आहात, तुम्ही कोणता कर भरता? तुमच्याकडे कोणते उद्योग आहेत, आमच्याकडे खाणी आहेत. झारखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेश, ओडिशात आहेत, तुमच्याकडे कोणत्या खाणी आहेत?” असा सवाल त्यांनी केला. “जर तुमच्यात हिंम्मत असेल, तर उर्दू भाषिकांना, तेलगू-तमिळ भाषिकांनाही मारहाण करा, तरच आम्ही समजू की खरंच तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचे वारस आहात आणि त्यांच्याच विचारांवर ते चालतात” असंही दुबे म्हणाले. “राज ठाकरेंमध्ये जर हिंमत असेल तर त्यांनी बिहारमध्ये येऊन दाखवावं, उचलून, उचलून आपटू” अशा पद्धतीची भाषा निशिकांत दुबे यांनी वापरली होती.