नीलम गोऱ्हेंच्या सुरक्षारक्षकाचा धक्का लागला, वरुण सरदेसाई संतापले, नेमकं काय घडलं?
Marathi July 10, 2025 07:25 PM

मुंबई: शिवसेना नेत्या आणि विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या सुरक्षा रक्षकाचा धक्का लागल्यानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार वरुण सरदेसाई संतापले. नीलम गोऱ्हे यांनी देखील यावेळी मुद्दामहून धक्का लागलेला नाही, मी नम्रपणे सांगतेय तरी तुम्ही खेकसताय, ही कुठली तुमची संस्कृती असं म्हटलं. शिवसेनेच्या दोन्ही गटाचे नेते विधिमंडळ अधिवेशनात आक्रमक झाल्याचं वारंवार पाहायला मिळत आहे. सकाळीच ठाकरेंच्या शिवसेनेचे अनिल परब आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांच्यात वाद झाला होता.

वरुण सरदेसाई आणि नीलम गोऱ्हे काय म्हणाल्या?

विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे विधानभवनात जात असताना ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार वरुण सरदेसाई यांनी सुरक्षारक्षकाचा धक्का लागल्यानं संताप व्यक्त केला. इथं काय अतिरेकी घुसलेत,दुसऱ्यांदा धक्का लागला मला, दुसऱ्यांदा झालं हे, असे कसे धक्के लागतात, असा सवाल वरुण सरदेसाई यांनी केला. यानंतर नीलम गोऱ्हे थोडं पुढं निघून गेल्या आणि मुद्दामहून धक्का लागलेला नाही, मी नम्रपणे सांगतेय तरी तुम्ही खेकसताय, ही कुठली तुमची संस्कृती असं म्हणाल्या. यानंतर नीलम गोऱ्हे विधानभवनात गेल्या.

आमदार वरुण सरदेसाई काय म्हणाले?

आमदार वरुण सरदेसाई यांनी काही झालंय वारंवार स्वत:ला व्हीआयपी समजणारे, एका बाजूला आम्हाला सांगितलं जातं की जास्त लोकांना आत घेऊन यायचं नाही. नीलम गोऱ्हे उपसभापती आहेत, त्यांच्या पदाचा मान राखतो. पण प्रत्येक वेळी येतानागेल्या वेळी त्यांच्यासोबत असलेल्या लोकांचा धक्का लागला,असं म्हटलं? विधानभवनाच्या आत जायला यायला हा एकमेव रस्ता आहे. इथं प्रचंड पोलीस सुरक्षा असते. हे दुसऱ्यांदा घडलं, गेल्या अधिवेशनात घडलेलंया वेळी देखील घडलं. या सभागृहात आमदारांचा यथोचित मान राखला पाहिजे. आमच्या छातीवर बिल्ले लावले आहेत. या आवारात आम्ही आमदार आहोत म्हणून बिल्ले लावतो. उपसभापतींसाठी मग वेगळी बस काढा, त्यांच्यासाठी विधानभवनाच्या टेरेसवर विमान उतरवा, असा टोला देखील सरदेसाई यांनी लगावला.

हे दुसऱ्यांदा घडलं, पहिल्यांदा घडलं काही बोललो नाही. यांच्यासोबत कोणी ओमणे, गोमणे सोमणे येतात, आमदारांना धक्के देतात, हे सगळं बंद झालं पाहिजे, असं वरुण सरदेसाई म्हणाले.

विधानभवनाच्या आवारात मुख्य गेट ते विधानभवनाच्या पॅसेजपर्यंत आमदार जर चालत असेल. आमदाराला उपसभापती किंवा इतर कोण असतील त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी किंवा कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की करणं योग्य आहे का याचं उत्तर मिळावं, असं वरुण सरदेसाई म्हणाले. गेल्यावेळी पायऱ्यांवर उभं असताना त्यांच्या एका सुरक्षारक्षकानं बाजूला करण्याचा प्रयत्न केला होता, असं वरुण सरदेसाई म्हणाले.

पाहा व्हिडिओ :

https://www.youtube.com/watch?v=Q0HZXC37KF8

हेदेखील वाचा

आणखी वाचा

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.