हल्ली सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपपर्यंत हातात मोबाईल असतोच. अगदी लहानमुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत हे चित्र आपल्याला दिसते. दिवसेंदिवस तर मोबाईल ऍडिक्शन असणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. मोबाईलच्या अतिवापरामुळे शारीरिक आरोग्यासह मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. मोबाईलची इतकी सवय लोकांना झाली आहे की, कोणी कॉल किंवा मेसेजेला रिप्लाय न दिल्यास अनेकजण ओव्हरथिंक करतात. हे एकाच्या बाबतीतच नाही अनेकांच्या बाबतीत घडत आहे. या स्थितीला किंवा जेव्हा एखाद्याला दुर्लक्षित किंवा नाकारलेले वाटते तेव्हा पीडित व्यक्ती रिजेक्शन सेंसिटिव डिस्फोरियाने (Rejection Sensitive Dysphoria) ग्रस्त असल्याचे सांगितले जाते. काय आहे हा आजार समजून घेऊयात
काय आहे हा RSD?
जेव्हा व्यक्तीला इग्नोर केले जाते, तेव्हा वाईट वाटणे सामान्य गोष्ट आहे. पण, जेव्हा व्यक्ती रिजेक्शन सेंसिटिव डिस्फोरियाने ग्रस्त असते तेव्हा कॉल किंवा मेसेजेलाही उत्तर न मिळाल्याने ओव्हरथिंक करू लागते. ज्या व्यक्ती (RSD) ने ग्रस्त असतात त्यांना छोट्या-छोट्या गोष्टींवरून वाईट वाटते. सर्वच गोष्टींचा अतिविचार या व्यक्ती करतात. रिसर्चनुसार, हा आजार ADHD (Attention-Deficit/Hyperactivity Disorder) असणाऱ्या व्यक्तींमध्ये दिसून येतो. ADHD ग्रस्त रुग्णांना भावनांवर नियंत्रण मिळवण्यास वेळ लागतो. कारण ADHD मध्ये भावंनावर नियंत्रण ठेवणारे मेंदूचे भाग वेगळ्या पद्धतीने काम करतो. ज्यामुळे विचार करण्यापूर्वीच भावना मनावर कब्जा करतात.
संशोधन काय सांगते?
ADHD असलेल्या व्यक्तीला अज्ञान किंवा टीकेमुळे जास्त दु:ख होते. 2024 मध्ये केलेल्या एका अभ्यासात असे आढळून आले आहे की, ज्यांच्यामध्ये ADHD ची लक्षणे दिसून येतात त्यांना टिकेची आणि नापंसतीची प्रचंड भिती वाटते.
हेही पाहा –