राजापूर समितीची
परळमध्ये सभा
राजापूर ः राजापूर पंचक्रोशी ग्रामविकास समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (ता.१३) सकाळी ११ वाजता मुंबई येथील परळ येथील सोशल सर्व्हिस लिग स्कूल शेजारील हॉल येथे होणार आहे. संस्थाध्यक्ष अनिल भोवड यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या सभेला संस्थेचे मुंबई-ग्रामीण सर्व पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्था सचिव विश्वास राघव यांनी केले आहे.
वेदांत, हर्षल
कॅरममध्ये विजेते
राजापूर ः श्री मारूती, गणपती पिंपळपार देवस्थान टिळकआळी गणेशोत्सव मंडळ शताब्दी महोत्सवानिमित्ताने रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशन जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धा झाली. या स्पर्धेमध्ये जैतापूर येथील वेदांत करंगुटकर याने १४ वर्ष वयोगटामध्ये आणि हर्षल पाटील याने सोळा वर्ष वयोगटाचे विजेतेपद पटकावले. या दोन्ही कॅरमपटूंना प्राथमिक शिक्षक एकनाथ पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. या यशस्वी खेळाडूंचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
---