जी. एम. शेट्ये हायस्कूलचा ७० वर्धापनदिन
esakal July 10, 2025 09:45 PM

-rat९p१८.jpg-
२५N७६४१२
रत्नागिरी : जी. एम. शेट्ये हायस्कूलच्या वर्धापनदिनानिमित्त देणगीचा धनादेश विलास भोसले यांच्याकडे देताना कदम गुरूजी. सोबत बापू गवाणकर, नाईक. आदी.
------------
‘शेट्ये हायस्कूल’चा ७०वा वर्धापनदिन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १० : तालुक्यातील बसणी येथील बसणी पंचक्रोशी शिक्षणसंस्था संचलित जी. एम. शेट्ये हायस्कूलचा ७०वा वर्धापनदिन नुकताच साजरा करण्यात आला. शाळा स्थापनादिनानिमित्त शाळेमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
प्रतिवर्षी देणगीदारांकडून दिल्या जाणाऱ्या बक्षिसांचे वितरण करण्यात आले. माजी विद्यार्थी व आदर्श शिक्षक कदम गुरुजी यांनी शाळेला पाच हजार रुपयांचा धनादेश दिला व पुढील वर्षी दहावी पास होणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस योजना जाहीर केली. संस्था कार्यकारिणी सदस्य प्रसाद (बापू) गवाणकर यांनी आपल्या शाळेच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले. कुसुमताई पतसंस्थेचे अध्यक्ष सतीश शेवडे यांनी त्यांच्या पतसंस्थेतर्फे दहा हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्था सचिव विलास भोसले यांनी विद्यार्थी जागरूक असण्याची आवश्यकता बोलून दाखवली.
--

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.