डॉ. सीमा कदम एनसीसीच्या मेजर पदाने सन्मानित
esakal July 10, 2025 09:45 PM

-rat९p२२.jpg-
२५N७६४४०
रत्नागिरी : डॉ. सीमा कदम यांना एनसीसीचे मेजर पदाने सन्मानित करताना कमांडिंग ऑफिसर के. राजेशकुमार व शशिकांत कदम.


डॉ. सीमा कदम मेजर पदाने सन्मानित
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १० : गोगटे-जोगळेकर महाविद्यालय आणि रत्नागिरीतील २ महाराष्ट्र नेव्हल युनिटच्या पहिल्या महिला एनसीसी ऑफिसर उपप्राचार्या डॉ. सीमा कदम यांना कमांडर के. राजेशकुमार यांच्या हस्ते मेजर रँक प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
गेली २८ वर्षे त्या गोगटे महाविद्यालयात शिकवत आहेत. एनसीसीच्या (नेव्हल) त्या अधिकारीही आहेत. २००६ मध्ये भारत सरकारच्या रक्षा मंत्रालयाकडून महाराष्ट्र ६ गर्ल्स बटालियन कोल्हापूरअंतर्गत २ महाराष्ट्र नेव्हल युनिट रत्नागिरीसाठी पहिली महिला एनसीसी ऑफिसर म्हणून नियुक्ती मिळाली. आंतरराष्ट्रीय एनसीसी शिबिरामध्ये त्या व्यवस्थापनाचे काम करत आहेत. त्यांना मेजर पदवी प्राप्त झाल्याबद्दल रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पा पटवर्धन, कार्यवाह सतीश शेवडे, प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर आदींनी अभिनंदन केले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.