चातुर्मासात तुळशीजवळ दिवा लावणे मानले जाते शुभ, जाणून घ्या हे आश्चर्यकारक फायदे व नियम
Tv9 Marathi July 10, 2025 11:45 PM

देवशयनी एकादशीच्या दिवशी म्हणजेच 6 जुलैपासून चातुर्मास सुरू झाला आहे. हा काळ विशेषतः भगवान विष्णूंच्या पूजेसाठी खूप महत्वाचा मानला जातो. धार्मिक मान्यतेनुसार भगवान विष्णू योग निद्रामध्ये जातात आणि 4 महिन्यांनी देवउठणी एकादशीला पुन्हा जागे होतात. त्यामुळे या 4 महिन्यात तुम्ही भगवान विष्णू यांना प्रिय असलेल्या तुळशीचे पूजन करावे. कारण चातुर्मासात तुळशीची पूजा करून दिवा लावल्याने व्यक्तीला ऐश्वर्य प्राप्त होते आणि घरात सुखऱ्‍ समृद्धी येते. तर अशावेळेस चातुर्मासात तुळशीशी संबंधित कोणते नियम तुम्ही विशेषतः लक्षात ठेवले पाहिजेत ते आजच्या या लेखातून आपण जाणून घेऊयात.

हे नियम नक्की लक्षात ठेवा

चातुर्मासात तुळशीला पाणी अर्पण करणे आणि दिवा लावणे शुभ मानले जाते. फक्त लक्षात ठेवा की रविवार आणि एकादशीला तुळशीला पाणी अर्पण करू नका. कारण धार्मिक मान्यतेनुसार माता लक्ष्मी राविवारी व एकादशीला श्री भगवान विष्णू यांचे निर्जला व्रत करते. अशा स्थितीत या दिवशी तुळशीला पाणी अर्पण करू नये. पण इतर दिवशी सकाळी तुळशीला नेहमीच पाणी अर्पण करावे. यासोबतच तुळशीजवळ स्वच्छतेचीही काळजी घेतली पाहिजे, अन्यथा देवी लक्ष्मी तुमच्यावर रागावू शकते.

दिवे लावण्याचे नियम

चातुर्मासात दररोज संध्याकाळी तुळशीजवळ शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लावावा. त्यानंतर भक्तीभावाने तुळशीमातेची आरती करा आणि तिच्या मंत्रांचा जप करा. लक्षात ठेवा की दिवा पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून असावा. असे केल्याने घरात सकारात्मकता वाढते आणि सुख-समृद्धीचे वातावरण राहते.

तुम्हाला हे फायदे मिळतील

तुळशीजवळ दिवा लावल्याने व्यक्तीला अशुभ ग्रहांच्या प्रभावापासून मुक्तता मिळते. तुळशीजवळ गायीच्या तुपाचा दिवा लावल्याने धन, विवाह आणि शिक्षणाचे कारक मानले जाणारे गुरु आणि शुक्र यांची स्थिती मजबूत होते.

या दिवशी तुळशीचे रोप लावावे

धार्मिक मान्यतेनूसार घरामध्ये तुळशीचे रोप लावण्यासाठी गुरूवार आणि शुक्रवार हे दिवस उत्तम मानले जातात. या दिवशी तुळशीची पूजा केल्याने व्यक्तीला शुभ फळ मिळते आणि देवी लक्ष्मी प्रसन्न होते.

जर तुम्ही नियमितपणे तुळशीसमोर दिवा लावला तर माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहते. यामुळे आर्थिक समृद्धी येते. यासोबतच, भगवान विष्णूंचा आशीर्वाद साधक आणि त्याच्या कुटुंबावरही राहतो.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.