देशविरोधी कृत्य आणि अवैध पद्धतीनं धर्मांतरणाचा आरोप असलेल्या जमालुद्दीन उर्फ छांगूर बाबा आणि त्याची साथीदार नितू उर्फ नसरीन यांना उत्तर प्रदेश एटीएसने काही दिवसांपूर्वीच अटक केली आहे. त्यांच्या चौकशीमधून अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.छांगूर बाबा हा उत्तर प्रदेशच्या बलारामपूर जिल्ह्यातल्या मधपूरमधील रहिवासी आहे.समोर आलेल्या माहितीनुसार त्याने आतापर्यंत तब्बल 1500 पेक्षा अधिक हिंदू मुलींचं अवैध पद्धतीनं धर्मांतरण केलं आहे.
दरम्यान उत्तर प्रदेशात जाण्यापूर्वी छांगूर बाबा हा मुंबईतील एका दरगाहच्या बाहेर आंगठी विकण्याचा व्यावसाय करत होता.आता त्याचं पुणे कनेक्शन देखील समोर आलं असून, धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा छगूर बाबा पुणे जिल्ह्यातल्या लोणावळ्यात असलेली तब्बल 16 कोटी रुपये किंमतीची जमीन खरेदी करण्यासाठी पुण्यात आला होता. त्यावेळी त्याने खरेदीचे सर्व दस्त नोंदणीही केली होती, मात्र या जमीन खरेदी व्यवहार प्रकरणात त्याने मोहम्मद खान नामक व्यक्तीला फसविल्याची माहिती आता समोर आली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये वास्तव्यास असलेल्या मोहम्मद खान नावाच्या या व्यक्तीने छांगूर बाबा आणि त्याच्या टोळीचे इतरही काही काळे कारनामे उघड केले आहेत.
दुबईपर्यंत नेटवर्क
समोर आलेल्या माहितीनुसार छांगूर बाबा हा मुंबईतील एका दरगाहच्या बाहेर आंगठी विकण्याचं काम करत होता, त्यानंतर तो अशा आंतरराष्ट्रीय टोळ्यांच्या संपर्कात आला, ज्या टोळ्या अवैध पद्धतीनं धर्मांतरण घडवून आणत आहेत, त्यानंतर या बाबानं या टोळ्यांसोबत आपणं बस्तान बसवलं आणि थेट दुबईपर्यंत नेटवर्क तयार केलं.
1500 पेक्षा अधिक हिंदू मुलींचं धर्मांतरण
दरम्यान या बाबाने 1500 पेक्षा अधिक हिंदू मुलींचं धर्मांतर केल्याची माहिती समोर येत आहे, त्याने नक्की किती जणांचं धर्मांतरण केलं याचा अधिकृत आकडा अद्याप समोर आलेला नाही, उत्तर प्रदेश एटीएसकडून त्याचा शोध सुरू आहे. त्याच्या चौकशीमधून अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहे. दरम्यान आता त्याचं पुणे कनेक्शन देखील समोर आलं आहे.