गुरूग्राम येथे धक्कादायक घटना उघडकीस आली असून राज्यस्तरीय टेनिसपटू राधिका यादवची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.
धक्कादायक म्हणजे राधिका यादवची हत्या तिच्या वडिलांनीच केल्याने गुरुग्राममध्ये खळबळ उडाली आहे
पोलिसांनी चौकशीसाठी आरोपी वडील दीपक यादव यांना ताब्यात घेतले असून त्यांनी पाच गोळ्या झाडल्या होत्या. त्यातील तीन गोळ्या राधिकाला लागल्या.
सध्या पोलिस घटनेचा तपास करत असून अद्याप हत्येचे कारण समोर आलेलं नाही. पण राधिकाच्या एक रिल पोस्ट केल्याने कुटुंबात वाद झाल्याची चर्चा सध्या सुरू आहे.
राधिका यादवचा जन्म 23 मार्च 2000 साली झाला होता. तिने हरियाणाची टेनिसपटू म्हणून नाम कमावले होते.
तर महिला दुहेरी प्रकारात ती हरियाणामध्ये पाचव्या क्रमांकावर आणि आंतरराष्ट्रीय क्रमवारीत भट्ट आणि थानिया गोगुलामंडा सारख्या भारतीय खेळाडूंच्या आसपास होती.
राधिका यादवची आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशन (ITF) मध्ये दुहेरी रँकिंगमध्ये 113 व्या क्रमांकावर होती.