England vs India, 3rd Test at Lord's, London: शुभमन गिल हा इंग्लंडच्या या दौऱ्यात विराट कोहलीची उणीव जाणवू देत नाही. फलंदाजीत चौथ्या क्रमांकावर मिळालेल्या संधीचं तर त्याने सोनं केलं आहेच, शिवाय त्याच्यात विराटची आक्रमकताही दिसतेय. तो इंग्लंडच्या खेळाडूंची स्लेजिंग करताना दिसतोय आणि त्याला मोहम्मद सिराजची साथ मिळाली. जो रूट व ऑली पोप यांचा संयम तोडण्यासाठी या दोघांनी टोमण्यांचा बाऊन्सर टाकलेला दिसला.
इंग्लंडला २ बाद ४४ धावांवरून जो रूट व ऑली पोप या जोडीने शतकी भागीदारी करून भारताची डोकेदुखी वाढवली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या इंग्लंडला एका तासानंतर दोन धक्के बसले. नितीश कुमारने त्याच्या पहिल्या व डावातील १४ व्या षटकात बेन डकेट ( २३) व झॅक क्रॉली ( १८) या दोन्ही सलामीवीरांना माघारी पाठवले. पण, जो रूट व ऑली पोप यांनी शतकी भागीदारी करून संघाला सावरले.
IND vs ENG 3rd Test: रिषभ पंत जखमी, तातडीने मैदानाबाहेर गेला; यष्टींमागे दुसरा खेळाडू उभा राहिला, भारताला धक्काभारताचा यष्टिरक्षक रिषभ पंत बोटाच्या दुखापतीमुळे मैदानाबाहेर जावे लागले. ध्रुव जुरेल यष्टींमागे उभा आहे. मोहम्मद सिराज आणि कर्णधार शुभमन गिल यांनी या जोडीची एकाग्रता भंग करण्याचा भरपूर प्रयत्न केला, परंतु त्याचा फार फरक नाही पडला. रूटने भारताविरुद्ध कसोटीत ३००० धावा करणाऱ्या पहिल्या फलंदाजाचा मान या कसोटीत पटकावला. इंग्लंडने दुसऱ्या सत्रात एकही विकेट न गमावा २४ षटकांत ७० धावा केल्या.
टी ब्रेकनंतर इंग्लंडला धक्का बसला, रवींद्र जडेजाने १०९ ( २११ चेंडू) धावांची भागीदारी तोडली. पोप १०४ चेंडूंत ४ चौकारांसह १०४ धावांवर झेलबाद झाला. रूटने ( ३०) अर्धशतकांसह भारताविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५०+ धावांच्या विक्रमात स्टीव्ह स्मिथ व शिवनरीन चंद्रपॉल यांना मागे टाकले. कसोटीत ५०+ धावांच्या विक्रमात रूटने ( १०३) जॅक कॅलिस व रिकी पाँटिंग यांच्याशी बरोबरी केली. त्यानंतर आलेल्या हॅरी ब्रूकला ( ११) जसप्रीत बुमराहने त्रिफळाचीत केले.
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराज झेल पकडायला गेला, ऑली पोपने लगेच चेंडू हाताने खाली ठेवला; नेमकं काय घडलं वाचादोन्ही सलामीवीर माघारी परतल्यानंतर जो रूट व ऑली पोप यांनी इंग्लंडचा डाव सावरला होता. इंग्लंडचा संघ हा बॅझबॉल म्हणजेच आक्रमक फटकेबाजीसाठी ओळखला जातो. पण, रूट व पोप यांनी दोनच्या सरासरीने धावा सुरू ठेवल्या होत्या. त्यामुळे गिल व सिराजयांनी त्यांना टोमणे मारले. गिल म्हणाला, कंटाळवाण्या कसोटी क्रिकेटमध्ये तुमचं स्वागत. त्याचवेळी सिराज, बॅझबॉल कुठेय असा सवाल केला.