मल्टीबॅगर स्टॉक: शेअर मार्केटच्या (Share Market) माध्यमातून मोठा नफा मिळवता येतो. यामध्ये काही प्रमाणात धोकाही असतो. बऱ्याचदा असे घडते की काही शेअर्स गुंतवणूकदारांना (investors) एका झटक्यात उंचीवरून जमिनीवर आणतात, तर काही शेअर्स असे असतात जे त्यांना रातोरात श्रीमंत बनवतात. जर तुम्ही योग्य वेळी योग्य स्टॉकमध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला मोठा परतावा मिळतो. आज आपण अशा स्टॉकबद्दल माहिती पाहणार आहोत की, ज्याने शेअरने बाजाराला हादरवून टाकले आहे. गेल्या पाच वर्षांत या स्टॉकने 36900 टक्के इतका जबरदस्त परतावा दिला आहे.
हा स्टॉक भारतातील रिअल इस्टेट आणि पायाभूत सुविधा कंपनी हुजूर मल्टी प्रोजेक्ट्स (Hazoor Multi Projects Ltd) आहे. रस्ते बांधकाम आणि रिअल इस्टेट व्यवसायात गुंतलेल्या कंपनीला 2024-25 या आर्थिक 40 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला. जो मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे 37 टक्के कमी आहे. गेल्या वर्षी तिचा नफा 64 कोटी रुपये होता. 2024-25 च्या मार्च तिमाहीत या कंपनीचा नफा 17 कोटी रुपये होता, जो वार्षिक आधारावर 68.52 टक्के कमी होता, तर गेल्या वर्षी याच तिमाहीत तो 54 कोटी रुपये होता.
जुलै 2020 मध्ये या कंपनीच्या शेअरची किंमत 0.12 रुपये होती. पण, आता हा शेअर 44.50 रुपयांच्या आसपास व्यवहार करत आहे. म्हणजेच, कल्पना करा की जर एखाद्या गुंतवणूकदाराने पाच वर्षांपूर्वी हुजूर मल्टी प्रोजेक्ट्सच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये गुतंवले असतील तर त्याला 8.33 लाख शेअर्स खरेदी करु शकला असता. पण, जेव्हा हे शेअर्स 44 रुपयांच्या बाजारभावाने विकले गेले, तेव्हा त्याची किंमत 3 कोटी 70 लाख रुपयांपर्यंत वाढली असती. म्हणजेच, अशा प्रकारे, हुजूर मल्टी प्रोजेक्ट्सने दीर्घकालीन गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे आणि स्वतःला मल्टीबॅगर स्टॉक म्हणून सिद्ध केले आहे.
हुजूर मल्टी प्रोजेक्ट्स ही कंपनी रस्ते बांधकाम आणि रिअल इस्टेट व्यवसायात काम करणारी कंपनी आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. यामुळं गुंतवणूकदारांना मोठा परतावा मिळाला आहे. गेल्या पाच वर्षांत या स्टॉकने 36900 टक्के इतका जबरदस्त परतावा दिला आहे. लै 2020 मध्ये या कंपनीच्या शेअरची किंमत 0.12 रुपये होती. पण, आता हा शेअर 44.50 रुपयांच्या आसपास व्यवहार करत आहे.
महत्वाच्या बातम्या:
आणखी वाचा