Ravindra Jadeja चं सलग चौथं अर्धशतक, लॉर्ड्स टेस्ट रंगतदार स्थितीत, विजयासाठी 30 धावांची गरज, टीम इंडिया जिंकणार?
GH News July 15, 2025 12:07 AM

रवींद्र जडेजा याने इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पाचव्या आणि शेवटच्या दिवशी टी ब्रेकपर्यंत नॉट आऊट 56 रन्स करत टीम इंडियाला 9 विकेट्स गमावून 163 धावांपर्यंत पोहोचवलं आहे. टी ब्रेकपर्यंत मोहम्मद सिराज 2 धावांवर नाबाद राहिला. इंग्लंडने टीम इंडियासमोर 193 धावांचं आव्हान ठेवलं आहे. त्यामुळे टीम इंडियाला विजयासाठी तिसऱ्या आणि शेवटच्या सत्रात विजयासाठी आणखी 30 धावांची आणखी गरज आहे. त्यामुळे तिसरा सामना कोण जिंकणार? याची उत्सुकता क्रिकेट चाहत्यांना लागून आहे.

केएल राहुल याचा अपवाद वगळता टीम इंडियाच्या टॉप आणि मिडल ऑर्डरमधील फलंदाजांनी 193 धावांचा पाठलाग करताना निराशा केली. त्यामुळे टीम इंडिया अडचणीत सापडली.

वॉशिंग्टन सुंदर आऊट झाल्याने भारताची स्थिती 7 आऊट 82 अशी झाली. त्यानंतर जडेजाने शेपटीच्या फलंदाजांसोबत निर्णायक भागीदारी करत टीम इंडियाला सामन्यात कायम ठेवलं. सुंदर आऊट देण्यासाठी जडेजाची साथ देण्यासाठी नितीश कुमार रेड्डी मैदानात आला.

जडेजा आणि नितीश या दोघांनी आठव्या विकेटसाठी 30 धावा जोडल्या. नितीश कुमार 13 धावा करुन आऊट झाला. त्यानंतर बुमराहनेही जडेजाला चांगली साथ दिली. मात्र बुमराह मोठा फटका मारण्याच्या मोहात कॅच आऊट झाला. बुमराहने 54 चेंडूत झुंजार 5 धावा केल्या.

बुमराह आऊट झाल्याने टीम इंडियाचा स्कोअर 9 आऊट 147 असा झाला. मोहम्मद सिराज मैदानात आला. सिराजनेही जडेजाला चांगली साथ दिली. जडेजाने या दरम्यान 68 व्या ओव्हरमधील पहिल्या बॉलवर चौकार ठोकत इंग्लंड विरूद्धच्या या मालिकेतील सलग चौथं अर्धशतक ठोकलं.

जडेजाने 150 चेंडूत 35.33 च्या स्ट्राईक रेटने झुंजार आणि चिवट अर्धशतक पूर्ण केलं. जडेजाने या दरम्यान 4 चौकार आणि 1 षटकार लगावला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.