नाशिकमधील ‘त्या’ दोन नेत्यांच्या भाजप प्रवेशाचा मार्ग मोकळा; तक्रारदारानेच मागे घेतला गुन्हा
Marathi July 15, 2025 01:25 AM

नाशिक: राज्यात गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील राजकीय घडामोडींनी लक्ष वेधले आहे. नाशिकमधील (Nashik) शिवसेना नेते सुधाकर बडगुजर यांनी उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र करत भाजपचं कमळ हाती घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र, त्यानंतर शिवसेना ठाकरे (Shivsena) गटाचे माजी उपनेते सुनील बागुल आणि माजी महानगरप्रमुख मामा राजवाडे यांचाही भाजप प्रवेश निश्चित झाला होता. पण, संजय राऊत (Sanjay Raut) यांनी त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्याचा उल्लेख करत पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर, ऐनवेळी त्यांचा भाजप प्रवेश रद्द करण्यात आला होता. आता, या दोन्ही नेत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण, बागुल आणि राजवाडे यांच्याविरुद्ध तक्रारदाराने केलेली तक्रार आता मागे घेतली आहे. त्यामुळे, आता शिवसेनेतील दोन्ही नेत्यांच्या भाजप प्रवेशाचा मार्ग मोकळा झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

सुनील बागुल आणि मामा राजवाडे यांच्याकडून मला मारहाण झाले नसल्याचे सांगत गुन्हे दाखल करणाऱ्या व्यक्तीनेच तक्रारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे आता लवकरच सुनील बागुल आणि मामा राजवडे या दोनही नेत्यांचे भाजप प्रवेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आमच्यावर जे गुन्हे दाखल झाले होते त्यावर फिर्यादीने तक्रार मागे घेतली आहे. या गुन्ह्याबाबत भाजप प्रवेशाचा संबंध नव्हता, तत्पूर्वी पक्षाने खात्री करायला पाहिजे होती. पक्षाने आमची विचारपूस करायला पाहिजे होती, पण हकालपट्टी हा शब्द चुकीचा आहे. आमच्यावर गुन्हा दाखल झाला होता तो चुकीचा होता, केवळ मंत्री असल्याने गिरीश महाजन यांना आम्ही भेटायला गेलो होतो. मात्र, पक्षातून आमची हकालपट्टी केल्याने आम्हाला पुढचा मार्ग मोकळा झाल्याचे सुनील बागुल यांनी म्हटलं आहे. माझी पक्षासोबत कोणतीही चर्चा झाली नाही, शिवसेनेत ज्याची हकालपट्टी होते त्यांनी पुन्हा तोंड दाखवायचे नाही असे आहे. भाजप किंवा इतर पक्षात जायचं हे आम्ही ठरवू, मी शिवसेनेवर नाराज नाही. कारण, मला पक्षाकडून कशाचीही अपेक्षा नव्हती, असेही बागुल यांनी म्हटलं.

पुढची दिशा लवकरच ठरवू – राजवाडे

मामा राजवाडे यांनीही तक्रारदाराने तक्रार मागे घेतल्यानंतर आपली प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांनी केलेल्या ट्विटमध्ये माझ्या हकलपट्टीचा उल्लेख नाही. आम्ही राजकीय शत्रू होतो, त्यामुळे गुन्हे दाखल झाले. तक्रारदार यांना मित्रता जागी झाली आणि त्यांनी गुन्हे मागे घेतले. आता, शिवसेनेत माझ्या जागेवर दुसऱ्या व्यक्तीचे नेमणूक केली आहे, त्यामुळे मी पुढचा निर्णय घेईल, माझी पुढची दिशा लवकरच ठरवू, असे मामा राजवाडे यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटले.

हेही वाचा

समृद्धी महामार्गावरुन 121 किलो गांजाची तस्करी; पोलिसांचे सायरन वाजले, सिनेस्टाईल पाठलाग, तिघांना अटक

आणखी वाचा

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.