ZIM vs SA : दक्षिण आफ्रिकेची विजयी सलामी, झिंबाब्वेचा 5 विकेट्सने धुव्वा
GH News July 15, 2025 03:05 AM

दक्षिण आफ्रिकेने त्रिसदस्यीय मालिकेतील पहिल्या टी 20i सामन्यात झिंबाब्वेवर 5 विकेट्सने मात करत विजयी सलामी दिली आहे. यजमान झिंबाब्वेने कर्णधार सिकंदर रझा याच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेसमोर 142 धावांचं माफक आव्हान ठेवलं होतं. दक्षिण आफ्रिकेने हे आव्हान 25 बॉलआधी 5 विकेट्स गमावून पूर्ण केलं. दक्षिण आफ्रिकेने 15.5 ओव्हरमध्ये 5 विकेट्सच्या मोबदल्यात 142 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेने यासह ट्राय सीरिजमध्ये शानदार सुरुवात केली. आता या मालिकेतील दुसरा सामना हा 16 जुलैला दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात होणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.