फॅशनच्या दुनियेत जसे दिवसाला नवीनवीन ट्रेंड येतात. त्याचप्रमाणे स्किनकेअर ट्रिटमेंटमध्येही दिवसाला नवीन प्रकार येत आहेत. हल्ली ब्युटी ट्रिटमेंटमध्ये सर्वात चर्चीला जाणारा प्रकार आहे, आइस मसाज (Ice Massage). अगदी सेलिब्रिटींसह सामान्य महिलाही त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी चेहऱ्यावर बर्फाने मसाज करत आहेत. चेहऱ्यावर बर्फाने मसाज केल्याने बरेच फायदे मिळतात. जेव्हा तुम्ही चेहऱ्यावर बर्फ घासता तेव्हा रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे त्वचेला आवश्यक पोषकतत्वे आणि ऑक्सिजनचा पुरवठा होते. परिणामी, चेहऱ्याचा रंग उजळण्यास मदत होते. आज आपण जाणून घेऊयात चेहऱ्यावर बर्फाने मसाज करण्याचे फायदे कोणते आहेत.
Sala (आईस मसाजचे फायदे)
मुरुमांपासून सुटका –
बर्फ मुरुमांची समस्या कमी करण्यासाठी सर्वात सोपा उपाय आहे. बर्फामुळे त्वचेवरील लालसरपणा कमी होतो.
पोअर्सवर प्रभावी –
बर्फाच्या मसाजमुळे त्वचेतील उघड्या छिद्रांना घट्ट होण्यास मदत होते. ज्यामुळे त्वचा नितळ आणि चमकदार बनते.
सूज कमी होते –
सकाळी उठल्यावर तुम्हाला सुजलेल्या चेहऱ्याची समस्या असेल तर तुम्ही आइस मसाज करायला हवे. सुजलेल्या डोळ्याखाली बर्फ चोळल्याने त्वरीत आराम मिळतो आणि सूज उतरते.
सुरकुत्या रोखते –
बर्फाच्या नियमित मसाजने चेहऱ्यावरील सुरकुत्या रोखल्या जातात.
मेकअप करण्यापूर्वी वापरणे फायद्याचे –
मेकअप करण्यापूर्वी बर्फ चोळल्याने मेकअप जास्त काळ टिकतो. ज्यामुळे मेकअप नैसर्गिक दिसतो.
आइस मसाज कसा करायचा?
हेही पाहा –