तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताच्या पदरी निराशा पडली आहे. अवघ्या 22 धावांनी भारताचा निसटता पराभव झाला. त्यामुळे नैराश्य पदरी पडलं असणार यात काही शंका नाही. पण हे नैराश्य झटकून आता चौथ्या सामन्यासाठी कंबर कसावी लागणार आहे. कारण चौथा कसोटी सामना हा करो या मरोची लढाई असणार आहे. हा सामना भारताने गमावला तर मालिका हातून गेली. त्यामुळे पाचव्या सामन्याला तसा काही अर्थ उरणार आहे. आतापर्यंत झालेल्या तीन सामन्यात इंग्लंडने 2-1 ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे पुढचा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याचं ध्येय असणार आहे. चौथ्या कसोटी सामन्यासाठी 8 दिवसांचा अवधी शिल्लक आहे. मात्र इंग्लंडने याआधीच फासे टाकले आहे. 23 जुलैला सुरु होणाऱ्या सामन्यासाठी प्लेइंग 11 जाहीर केली आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केलं की, चौथ्या कसोटी सामन्यासाठी संघात एक बदल केला आहे.
लॉर्ड्स कसोटी सामन्यात शोएब बशीरने मोहम्मद सिराजची विकेट काढली आणि सामना जिंकून दिला. मात्र आता चौथ्या सामन्यात खेळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. कारण या सामन्यादरम्यान त्याला दुखापत झाली होती. चौथ्या डावात गोलंदाजीसाठी येणार नव्हता. पण हा सामना हातून जाण्याची भीती असल्याने स्टोक्सने त्याला खेळण्याची विनंती केली. त्याने जखमी अवस्थेतच सामना जिंकून दिला. आता त्याच्या जागी संघात लियाम डॉसनची निवड करण्यात आली आहे. लियामचं नाव फार काही चर्चेत नाही. पण तीन कसोटीत 7 विकेट घेतल्या आहेत. 6 वनडे सामन्यात 5 विकेट, तर 14 टी20 सामन्यात 11 गडी बाद केले आहेत.
लियामने 2016 मध्ये भारताविरुद्ध कसोटीत पदार्पण केलं होतं. तसेच शेवटचा कसोटी सामना 2017 मध्ये खेळला होता. जवळपास 8 वर्षांनी लियाम डसन कसोटीत पदार्पण करत आहे. चौथ्या कसोटीसाठी इंग्लंड क्रिकेट संघाची घोषणा केली आहे. बेन स्टोक्स (कर्णधार), जो रूट, जोफ्रा आर्चर, गस अॅटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, झॅक क्रॉली, लियाम डॉसन, बेन डकेट, ऑली पोप, जेमी ओव्हरटन, जोश टंग, ख्रिस वोक्स हे खेळाडू मैदानात उतरतील.