म्हाडाच्या कोकण मंडळाकडून 5285 घरं आणि 77 भूखंडासाठी सोडत, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
Marathi July 16, 2025 08:26 PM

मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा (म्हाडा) विभागीय घटक कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे ठाणे शहर व जिल्हा, वसई (जि. पालघर) येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत 5285 सदनिका आणि ओरोस (जि. सिंधुदुर्ग), कुळगाव-बदलापूर येथील 77 भूखंड विक्रीकरिता आयोजित सोडतीसाठी अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रिया सुरु झाली आहे. 14 जुलैपासून सोडतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 ऑगस्ट 2025 पर्यंत आहे. कोकण मंडळाच्या घरांसाठी ज्यांना अर्ज करायचा आहे त्यांना या प्रक्रियेचं संपूर्ण वेळापत्रक माहिती असणं आवश्यक आहे.

सोडतीचे वेळापत्रक

सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज व स्विकृतीची सुरूवातः 14/07/2025 Din? 1.00 वा. पासून

ऑनलाईन अर्ज देय स्विकृतीची सुरुवात : 15/07/2025 Din? 12?00 वा. पासून

ऑनलाईन अर्जासाठी नोंदणीची शेवटची तारीख व वेळ: 13/08/2025 रात्री 11.59 वा. पर्यंत

ऑनलाईन सर्व प्रकारच्या देय स्विकृतीसाठी शेवटचा दिनांक व वेळ : 14/08/2025 रात्री 11?59 वा. पर्यंत

सोडतीसाठी आत्म-नियंत्रण अर्जाच्या स्वरूप यादीची प्रसिद्धीः21/08/2025 संध्याकाळी? 06?00 वा. पर्यंत

स्वरूप यादी प्रसिद्ध झाल्यापासून ऑनलाइन दावे-हरकती दाखल करण्याचा अंतिम दिनांक व वेळः 25/08/2025 संध्याकाळी? 06?00 वा. पर्यंत

सोडतीसाठी आत्म-नियंत्रण अर्जाच्या अंतिम यादीची प्रसिद्ध 01/09/2025 संध्याकाळी? 06?00 किंवा.

सोडत दिनांक व वेळः03/09/2025 सकाळी 10.00 वा. (डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे))

सोडतीमधील यशस्वी अर्जदारांची नावे म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे 03/09/2025 संध्याकाळी? 06?00 किंवा.

अर्ज कुठं करायचा?

म्हाडा सोडतीसाठी अर्ज करण्याकरिता https://housing.mhada.gov.in हे अधिकृत संकेतस्थळ असून या व्यतिरिक्त कुठल्याही अनधिकृत संकेतस्थळावर अर्जदारांनी सोडतीत सहभाग घेऊ नये, कोणतीही वैयक्तिक माहिती देऊ नये तसेच कोणतेही आर्थिक व्यवहार करू नये, असे म्हाडाकडून सांगण्यात आलं आहे.सदनिकांच्या विक्रीकरिता मंडळाने कोणालाही प्रतिनिधी, सल्लागार व प्रॉपर्टी एजंट नेमलेले नाही. त्यामुळे अर्जदाराने कोणत्याही त्रयस्थ /दलाल/ मध्यस्थ व्यक्तीच्या प्रलोभनांना बळी पडू नये. तसेच अशा प्रकारच्या गैरव्यवहारास अथवा फसवणुकीस कोकण मंडळ अथवा म्हाडा अथवा मंडळाचे प्रशासन जबाबदार राहणार नाही, असं सांगण्यात आलं आहे.

कोकण मंडळाच्या लॉटरीची सविस्तर माहिती

कोकण मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेली ही सोडत पाच घटकांमध्ये विभागण्यात आली आहे. 20 टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत एकूण 565 सदनिका, 15 टक्के एकात्मिक शहर गृहनिर्माण योजनेअंतर्गत 3002 सदनिकाम्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजना व विखुरलेल्या सदनिका आहे त्या स्थितीमध्ये या योजनेअंतर्गत 1677 सदनिकाम्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजनेअंतर्गत (50 टक्के परवडणाऱ्या सदनिका)) 41 सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तसेच म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजनेअंतर्गत 77 भूखंड विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.