मागच्या दोन वर्षांपासून इस्रायल युद्धच लढतोय. आधी हमास, नंतर हिजबोल्लाह मागच्या महिन्यात इराण आणि आता सीरिया विरुद्ध युद्ध. इस्रायलची ही लढाई आजचीच नाहीय, या देशाच्या स्थापनेपासूनची आहे. कारण इस्रायलला सर्व बाजूंनी मुस्लिम देशांच्या सीमा लागून आहेत. इस्रायलने नुकत्याच सीरियामध्ये केलेल्या एअर स्ट्राइकमुळे सगळेच हैराण झालेत. ड्रूज समुदायाच्या रक्षणासाठी आपण हे पाऊल उचललय असं इस्रायल दाखवतोय. पण हे सगळं वरवरच आहे. सीरियाविरोधात इतकी मोठी कारवाई करण्यामागे इस्रायलच मोठं रणनितीक उद्दिष्टय आहे. दूर की सोच ज्याला आपण म्हणतोना ते प्लानिंग या हल्ल्यामागे आहे. इस्रायलने इशारा म्हणून सीरियाच्या राष्ट्रपती भवनाजवळ हल्ले केले आहेत. मागच्या महिन्यात इराण विरुद्ध सीजफायर झालं. त्याला अजून महिना सुद्धा झालेला नसताना इस्रायलने थेट इतकं मोठ पाऊल कसं उचललं?. हा अनेकांच्या मनात प्रश्न आहे, त्याचं उत्तर इथे वाचा.
मिडिल ईस्टमध्ये परिस्थिती पुन्हा एकदा तणावपूर्ण झाली आहे. यावेळी सीरियावर इस्रायलने भीषण हल्ले केले. त्यामुळे इराण खवळला आहे. परिस्थिती इतकी गंभीर आहे की, इराणने त्यांच्या प्रॉक्सी गटांना इस्रायलची घेराबंदी करण्याचे आदेश दिले आहेत. इस्रायलने सीरीयामध्ये विद्धवंस घडवून पुढचा नंबर इराणचा असल्याचे संकेत दिले आहेत. सीरियाच्या मोठ्या भूभागावर ताबा मिळवून गोलन हाइट्सचा विस्तार हा इस्रायलच्या प्लानिंगचा भाग आहे. सीरियाचा भाग ताब्यात घेतल्यानंतर त्याचा सुरक्षा चक्र म्हणून वापर करण्याची इस्रायलची योजना आहे. इराणवर हल्ला करायचा आणि इराणने पलटवार केला, तर त्यांच्या मिसाइल्सना सीरियामध्येच रोखायचं. जेणेकरुन इस्रायलमध्ये जिवीतहानी-वित्तहानी होणार नाही. इस्रायल सीरियाला कशाप्रकारे युद्धभूमी बनवतोय ते या एक्सक्लूसिव रिपोर्टमधून जाणून घ्या.
इस्रायल सीरियाबद्दल उगचाच आक्रमक झालेला नाही
इस्रायल सीरियावर लागोपाठ हल्ले करतोय. सीरियावर जितके हल्ले होतायत, त्यामुळे इराणची चिंता वाढत चालली आहे. अल शाराला संपवण्याची धमकी दिल्यामुळे खामेनेईंची अस्वस्थतता वाढली आहे. सीरियामध्ये विद्धवंस घडवण्यामागे इस्रायलचा उद्देश खामेनेईच्या लक्षात आलाय. सीरियावर हल्ला फक्त एक बहाणा आहे. इराणचा पराभव हा खरा उद्देश आहे. इस्रायल सीरियाबद्दल उगचाच आक्रमक झालेला नाही. हा त्यांच्या प्लानिंगचा भाग आहे.
सीरियावर हल्ल्यामागे इस्रायलची पाच उद्दिष्ट्य काय?
सीरियावर हल्ला करण्यामागे इस्रायलचा पहिला उद्देश आहे, राष्ट्रपती अल शाराला कंट्रोलमध्ये घेणं. दुसरा इरादा गोलन हाइट्सचा विस्तार. तिसरा उद्देश इराणच्या प्रॉक्सी गटांचा विस्तार रोखणं आणि चौथा उद्देश हिजबुल्लाहच्या शस्त्रास्त्र पुरठवड्याच मार्ग कापणं. पाचवा मोठा उद्देश म्हणजे सीरियाला आपलं डिफेन्स झोन म्हणून वापरणं. सीरियावर हल्ले करुन इस्रायल इराणवर हल्ल्याचा रोडमॅप तयार करतोय. इराण पुरस्कृत दहशतवादी गटांना सीरियाच्या सीमेजवळ येऊ न देणं नंतर सीरियाच्या एअरस्पेस वापर करुन इराणला हतबल करणं इतका मोठा इस्रायलचा उद्देश आहे.
असं झाल्यास बेंजामिन सरकारवरील संकट टळेल
इस्रायलला सीरियात डिफेंस कॉरिडोर बनवायचा आहे, कारण त्यांना इराणचे हल्ले रोखायचे आहेत. म्हणून इस्रायलला दक्षिण सीरियावर ताबा हवा आहे. तिथे त्यांना मिलिट्री बेस बनवायचा आहे. तिथे एअर डिफेन्स सिस्टिमद्वारे इराणचे हल्ले रोखायचे आहेत. इस्रायलचे संरक्षण मंत्री काट्ज अमेरिकी दौऱ्यावर आहेत. ट्रम्प यांना समजावून इराणवर हल्ल्यासाठी ग्रीन सिग्नल मिळवण हा त्यांचा दौऱ्यामागचा उद्देश आहे. एकदा का इराणवर हल्ला केला की, अल्पमतात आलेल्या बेंजामिन सरकारवरील संकट टळू शकतं. म्हणून बेंजामिन नेतन्याहू पूर्ण ताकदीने सीरियावर हल्ले करुन इराणवर हल्ल्याचा मार्ग तयार करत आहेत.
इराणची राख करण्याच प्लानिंग
गोलन हाइट्सचा विस्तार करुन इस्रायलला नवीन सुरक्षा घेरा बनवायचा आहे. त्यासाठी संपूर्ण दक्षिण सीरियावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न आहे. सध्याच्या गोलन हाइट्सचा दमिश्क पर्यंत विस्तार करण्याच इस्रायलच प्लानिंग आहे. दक्षिण सीरियामध्ये 15000 वर्ग किमीचा भाग आहे. एकूण सीरियाच्या हा 8 टक्के भाग आहे. या भागाला डिफेन्स झोन बनवून इराणची राख करण्याच प्लानिंग आहे. दक्षिणी सीरियामध्येच इराणचे हल्ले रोखण्यासाठी सुरक्षा घेरा बनवण्याची योजना आहे. इराणकडून येणारी मिसाइल्स सीरियातच रोखता येतील. दक्षिण सीरियामध्ये एअर डिफेन्स सिस्टिम लावता येईल. मिसाइल, ड्रोन्सशिवाय फायटर जेट्सना सीरियाच्या हवाई हद्दीतच संपवता येईल. दक्षिण सीरियात बेस झाल्यास इथूनच इराणवर हल्ले करता येतील.
बेंजामिन नेतन्याहूना इराण विरुद्ध लढून काय लक्षात आलं?
13 जूनला इस्रायलने इराणवर हल्ला केला. पण इराणने पूर्ण ताकदीने पलटवार केला. बेंजामिन नेतन्याहूना ही गोष्ट समजली की, आपण शत्रुला जितके कमकुवत मानत होतो, इराण तितका कमजोर नाहीय. मागच्या 10 वर्षात इराणने स्वत:ला खूप मजबूत बनवलय. म्हणून इराणने लांब पल्ल्याच्या मिसाइलद्वारे इस्रायलच्या हायफा आणि तेल अवीव या शहरांवर हल्ले केले. इराण एका मोठ्या युद्धाची तयारी करतोय. म्हणूनच ते सतत प्रॉक्सी गटांचे हात बळकट करत आहे.
इराणने वाढवलं मिसाइल्स प्रोडक्शन
इराण एकाबाजूला मिसाइल्सच उत्पादन वाढवतोय. दुसरीकडे त्यांच्या ड्रोन्सचा रशियाला पुरवठा सुरु आहे. इराणकडे इस्रायलपर्यंत हल्ला करु शकणारी मिसाइल्स आहेत. लॉन्ग रेंज ड्रोन्स सुद्धा इराण त्यांच्या समर्थक दहशतवादी गटांना पुरवतोय. सध्या सीरियामध्ये जितक्या बंडखोर संघटना सक्रीय आहेत, हिज्बुल्लाह, कतैब हिज्बुल्लाह, फातमियां ब्रिगेड, जैनबियां ब्रिगेड, कुद्स फोर्स यांना इराण अजून बळकट करणारे हे उघड आहे. दक्षिण सीरियात या दहशतवादी गटांची ताकद वाढली तर इस्रायलच्या सीमा असुरक्षित होतील. लेबनानमधून हिज्बुल्लाह, येमेनमधून हूती आणि गाजामध्ये हमास एक्टिव आहे.
शस्त्रास्त्र लेबनानपर्यंत कशी पोहोचवली जातात?
इस्रायलला सीरियाच्या मोठ्या भागावर नियंत्रण हवं आहे. जेणेकरुन इराणचा हिज्बुल्लाह पर्यंत पोहोचण्याचा मार्ग त्यांना तोडून टाकायचा आहे. इराणमधून IRGC च्या संरक्षणाखाली शस्त्रास्त्र इराकपर्यंत पोहोचवली जातात. इराकच्या पुढे सप्लाय रुट सीरियापर्यंत आहे. संपूर्ण रस्त्यात प्रॉक्सी गट इराणला मदत करतात. पुढे हिज्बुल्लाहचे दहशतवादी हे ट्रक सीरियामध्ये आणतात. तिथून पुढे लेबनानमध्ये ही शस्त्र नेली जातात. अंडरग्राऊंड ठिकाणी ही शस्त्र लपवली जातात. इस्रायला हा रुटच तोडून टाकायचा आहे.
इराणने काय इशारा दिलाय?
सीरियावरील इस्रायलच्या हल्ल्यामुळे इराण सर्तक झालाय. त्यांनी दहशतवादी गटांना शस्त्रास्त्रांचा पुरवठा थांबवला आहे. सोबतच हूती, हमास आणि हिज्बुल्लाहला एक्टिव केलय. जेणेकरुन इस्रायलची घेराबंदी करता येईल. एकीकडे हुतींनी इस्रायलवर मिसाइल्स डागली, त्याचवेळी इराकमध्ये अमेरिकी तेल विहीरींवर सुद्धा हल्ला झाला. या दरम्यान इराणच्या सुप्रीम लीडरने धमकी देऊन आपले इरादे जाहीर केले. इराण प्रत्येक परिस्थितीसाठी तयार आहे. इराणमध्ये आगी लागण्याच्या घटना घडत आहेत. या सगळ्यामागे इस्रायलचा हात असल्याचा संशय आहे.