शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी कोल्हापूरात बोलताना मोठं विधान केलं आहे. हिंदुस्थानचा राष्ट्रध्वज तिरंगा नसून भगवा असल्याचे संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे. यामुळे वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. संभाजी भिडे यांनी असं नेमकं का म्हटलं ते सविस्तर जाणून घेऊयात.
कोल्हापूरात बोलताना शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी म्हटले की, ‘या देशात जो महायज्ञ सुरू आहे तो विझता कामा नये, या महायज्ञाची सांगता या देशाच्या शीर्षस्थानी भगवा झेंडा आला पाहिजे अशी करायची आहे. शिवछत्रपती गेले प्रचंड नैराश्य आले. आता पुढे काय ? असे प्रश्न आलेत. नंतर संभाजी महाराज छत्रपती झाले. केवळ पाहुणे नऊ वर्षे छत्रपती म्हणून त्यांनी आपल्या वडिलांना शोभेल असे काम केले.
वडिलांच्या तोडीस तोड कर्तृत्व गाजवले नंतर अतिक्रूर मरण त्यांच्या वाट्याला आले. संभाजी महाराज यांची हत्या झाली, त्या भडव्या औरंग्याने नीचपणा केला. हिरोजी फर्जंद सगळ्यांना म्हणाले शिवाजी महाराजांची आठवण करा आपण रायगडला जाऊयात, महाराज शेवटी ज्या जागेवर होते तिथे जाऊयात.
महाराजांच्या सर्व आठवणीतून धारकरी मराठा मंडळी उठली आणि महाराष्ट्रातील धारकऱ्यांनी कन्याकुमारी ते काश्मीर उभे आडवे 3200 किलोमीटर लांब 3200 किलोमीटर आडवे राज्य केलं. संपूर्ण देश पादाक्रांत केला. दिल्लीच्या मुघलाच तक्त तोडलं, तुकडे केले. मराठीने लाल किल्ल्यावरती 1784 ते 1803 भगवा फडकवून 19 वर्ष हिंदवी स्वराज्याचे राज्य केलं.
याची पुनरावृत्ती म्हणजेच हिंदुस्तानचा झेंडा तिरंगा नाही, हिंदुस्थानचा राष्ट्रध्वज भगवा आहे. तो परत लाल किल्ल्यावर फडकवण्याच्या कामानेच आजच्या उपोषणाची समाप्ती होणार आहे. डोळ्यांसमोर छत्रपती संभाजी राजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत त्यांच्या कामाची तीव्रता ही सूर्याच्या तेज्यासारखी आहे ती मावळणार नाही.
आत्ता स्वतंत्र्य आहे परंतु आम्हाला चंद्र हवा आहे. एका माऊलीने रामाच्या हातात आरसा दिला आणि हातातील आरशात चंद्र पाहून राम थंड झाला असं होता कामा नाही. काशीचा विश्वेश्वर पुन्हा निर्माण करून पाकिस्तानचा नायनाट करून हे स्वातंत्र्य भगव्या झेंड्याचे उत्पन्न करणारे उपोषण आहे.