धातूची माळ घालून एमआरआय मशिनजवळ गेला अन् जीव गमावून बसला, काय घडलं नेमकं?
Marathi July 21, 2025 12:24 AM

गळ्यात धातूची माळ घालून एमआरआय मशिनजवळ जाणं एका व्यक्तीला चांगलंच महागात पडलं आहे. धातूची माळ घालून जवळ येताच एमआरआय मशिनच्या शक्तीशाली चुंबकाने त्यांना आत खेचून खेचले. यात ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांना हृदयविकाराचे झटके आल्याने त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मयत व्यक्तीच्या मुलाने एमआरआय रुममधील तंत्रज्ञावर हलगर्जीपणाचा आरोप केला आहे. कीथ मॅकएलिस्टर असे मयत इसमाचे नाव आहे.

अमेरिकेतील लाँग आयलँड येथे ही खळबळजनक घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार 61 वर्षीय कीथ मॅकएलिस्टर हे पत्नीला गुडघ्याचं एमआरआय करण्यासाठी वेबस्टरी येथील नासाऊमध्ये एका एमआरआय सेंटरमध्ये घेऊन गेले होते. एमआरआय झाल्यानंतर टेबलवरून खाली उतरायला मदत करण्यासाठी त्यांच्या पत्नीने त्यांना बोलावण्यास सांगितले. त्यानुसार तंत्रज्ञाने कीथ यांना बोलावले, मात्र त्यांच्या गळ्यातील धातूची माळ बाहेर काढून येण्यास सांगण्यास तो उतरला.

कीथ जवळ येताच धातूच्या माळेमुळे एमआरआय मशिनमधील शक्तीशाली चुंबकाने त्यांना आत खेचून घेतले. यानंतर कीथ यांना हृदयविकाराचे झटके आले आणि त्यांचा मृत्यू झाला. तंत्रज्ञ वडिलांना त्यांच्या गळ्यातील माळ काढून ठेवण्याचे सांगण्यास विसरल्यामुळे हा अनर्थ घडला, असा आरोप कीथ यांच्या मुलांनी केला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.