वैभव सूर्यवंशी हे नाव ऐकलं की क्रीडाप्रेमींना तोडफोड करून फलंदाजी करणारा खेळाडू असं डोक्यात येतं. कारण आतापर्यंतच्या खेळीतून त्याने तसं दाखवून दिलं आहे. त्यामुळे त्याच्याकडून तश्याच कामगिरीची अपेक्षा वाढली आहे. भारत आणि इंग्लंड अंडर 19 संघात इंग्लंडच्या एसेक्स मैदानात दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात वैभव सूर्यवंशीकडून फार अपेक्षा होत्या. मात्र 14 चेंडूत 20 धावा करून बाद झाला. या खेळीत त्याने 2 षटकार आणि एक चौकार मारला. त्याचा स्ट्राईक रेट हा 140 पेक्षा जास्तीचा होता. पण वैभव सूर्यवंशीला षटकार मारण्याची सवय महागात पडणार असं दिसत आहे. कारण सध्या वैभव सूर्यवंशी फॉर्मात आहे. या सामन्यातही चेंडू त्याच्या बॅटच्या मधोमध लागत होता. पण अचानक आऊट झाला. असं होण्याचं कारण काय? या बाबत क्रीडाप्रेमींमध्ये चर्चा रंगली आहे.
वैभव सूर्यवंशी ही मूर्ती लहान असली तरी किर्ती महान आहे. वैभव उत्तुंग षटकार मारण्यात पटाईत आहे. डावखुरा वैभव खराब चेंडू दिसला की त्यावर तुटून पडतो. वैभव सूर्यवंशीने दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावातही आक्रमक सुरुवात केली. एक चौकार आणि दोन षटकार मारत त्याने आक्रमकता दाखवली. पण नंतर षटकार मारण्याच्या नादात विकेट देऊन बसला. भारताच्या डावातील सहाव्या षटकात विकेट दिली. एलेक्स ग्रीनच्या आखुड टप्प्याच्या चेंडूवर स्क्वेअर कटला षटकार मारला. त्याने ग्रीनने पुन्हा तसाच चेंडू टाकला. त्याला हुक मारण्याच्या नादात फसला आणि सीमेवर एलेक्स फ्रेंचने झेल पकडला. दरम्यान वैभव बाद झाल्यानंतर आयुष म्हात्रे आणि विहान मल्होत्रा यांनी डाव सावरला.
वैभव सूर्यवंशीने इंग्लंड दौऱ्यात चांगली कामगिरी केली आहे. आतापर्यंत वनडे आणि टेस्ट मालिकेत एकूण 32 षटकार मारले आहेत. वैभवने वनडे मालिकेत 29 षटकार मारले आहे. तर युथ टेस्ट मालिकेत 3 षटकार मारले आहेत. वैभव सूर्यवंशीने आतापर्यंत खेळलेल्या तीन डावात 90 धावा केल्या आहे. वैभव सूर्यवंशीकडे मोठी धावसंख्या करण्यासाठी आणखी एक डाव आहे. यात तो चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे.