कर्णधार हरमनप्रीत कौर हीने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर भारतीय महिला संघाने तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात इंग्लंडसमोर 319 धावांचं आव्हान ठेवलं आहे. भारताने 50 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 318 धावा केल्या. भारतासाठी हरमनप्रीत व्यतिरिक्त जेमिमाह रॉड्रिग्स हीने सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. तर इतरांनीही काही धावांची भर घातली. त्यामुळे भारताला 300 पार सहज मजल मारता आली. फलंदाजांनी त्यांची भूमिका चोखपणे पार पाडली. त्यानंतर आता भारताला सामन्यासह मालिका जिंकायची असेल तर गोलंदाजांवर मदार असणार आहे. त्यामुळे कोणता संघ अंतिम सामना जिंकून मालिकेवर नाव कोरतो, हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.