आजकाल मुलांच्या आहारात प्रक्रिया केलेले आणि अनहेल्दी पदार्थांचे सेवन अधिकच वाढत चालेले आहेत. बदलत्या जीवनशैलीमुळे लहान मुलं फास्ट फुड देखील खायला लागले आहेत. पालक अनेकदा मुलांच्या हट्टीपणाला बळी पडतात किंवा वेळेअभावी त्यांना पॅकेज्ड फूड देतात. पण काही पदार्थ असे आहेत जे मुलांच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक असू शकतात आणि त्या मुलांना खायला तसेच त्यांच्या आहाराचा भाग बनवू नये. चला जाणून घेऊयात अशा 5 पदार्थांबद्दल जे मुलांच्या आरोग्याला नुकसान पोहोचवू शकतात.
अनेक पालकांना वाटते की मुलांना नाश्त्यात शुगरी सीरियल्स देणे हा एक आरोग्यदायी पर्याय आहे, परंतु हा एक गैरसमज आहे. यामध्ये साखर, आर्टिफिशयल चव आणि प्रिझर्वेटिव्ह्ज प्रमाण जास्त असते, जे मुलांच्या चयापचय प्रक्रियेला नुकसान पोहोचवू शकतात. ते खाल्ल्याने लठ्ठपणा आणि मधुमेहाचा धोका वाढतो, दात किडण्याची शक्यता असते आणि भूक कमी लागते, ज्यामुळे पौष्टिकतेची कमतरता निर्माण होऊ शकते. याऐवजी मुलांना नाश्त्यात पोहे, उपमा किंवा होल-व्हीट ब्रेड खायला देणे अधिक फायदेशीर ठरू शकते.
दही हे प्रोबायोटिक्सचा चांगला स्रोत आहे, परंतु बाजारात उपलब्ध असलेल्या फ्लेवर्ड दह्यात भरपूर साखर आणि आर्टिफिशयल गोड पदार्थ मिक्स केलेले असतात. तर हे फ्लेवर्ड दही मुलांनी खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्तीवर वाईट परिणाम होतो. तसेच, लठ्ठपणा आणि पचनाच्या समस्या देखील उद्भवू शकतात. म्हणून याऐवजी ताज्या फळांमध्ये साधे दही मिक्स करून खायला द्या.
मुलांना फ्रेंच फ्राईज, समोसे, चिप्स आणि पकोडे यासारख्या पदार्थ खायला खूप आवडतात, पण त्यात ट्रान्स फॅट आणि अतिरिक्त कॅलरीज असतात, जे खाल्ल्याने मुलांना हृदयरोग होण्याची शक्यता असते. कोलेस्टेरॉलचा धोका वाढू शकतो आणि पचनाच्या समस्या देखील उद्भवू शकतात. याऐवजी मुलांना भाजलेले नट्स, बिया किंवा फळे स्नॅक्स म्हणून खायला द्या.
प्रक्रिया केलेल्या मांसामध्ये सोडियम, नायट्रेट्स आणि प्रिझर्वेटिव्ह्ज जास्त असतात, जे मुलांच्या आरोग्यासाठी हानिकारक असतात. हे पदार्थ खाल्ल्याने कर्करोगाचा धोका वाढतो, रक्तदाब वाढू शकतो आणि मूत्रपिंडांवर वाईट परिणाम होऊ शकतो. त्याऐवजी तुमच्या मुलांना घरी बनवलेले चिकन किंवा मासे खायला द्या. त्यात लीन प्रोटीन असते, जे आरोग्यासाठी फायदेशीर असते.
पॉपकॉर्न हा एक आरोग्यदायी नाश्ता असू शकतो, परंतु बाजारात उपलब्ध असलेल्या फ्लेवर्ड पॉपकॉर्नमध्ये आर्टिफिशयल फ्लेवर्स, MSG आणि अतिरिक्त मीठ असते. ते खाल्ल्याने मुलांना डिहायड्रेशन, किडनी प्रेशर आणि ॲलर्जीचा धोका वाढतो. तर हे पॉपकॉर्न न देता त्यांना तूप आणि सेंधव मीठ मिक्स केलेले साधे पॉपकॉर्न द्या.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)