तुम्हीही गरजेपेक्षा जास्त बदाम खाता का? तर ‘या’ 5 मोठ्या समस्यांचा करा लागेल सामना
GH News July 23, 2025 02:07 AM

निरोगी राहण्यासाठी व मेंदूचे आरोग्य चांगले राहण्यासाठी अनेकजण बदामाचे सेवन करत असतात. यासोबतच पोषक तत्वांनी समृद्ध असलेले बदाम शरीराला तंदुरुस्त ठेवण्यास आणि अनेक आजारांना दूर ठेवण्यास देखील मदत करतात. हृदय निरोगी ठेवण्यासाठी बदाम हा एक उत्तम पर्याय मानला जातो. कारण बदामात प्रथिने, फायबर, व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम आणि निरोगी फॅटसारखे अनेक पोषक घटक आढळतात.

हे सर्व पोषक तत्व शरीराला ऊर्जा देण्याचे काम करतात. सहसा दररोज सकाळी रिकाम्या पोटी चार ते पाच भिजवलेले बदाम खाण्याचा सल्ला दिला जातो. त्याच वेळी काही लोक ते न भिजवता खातात. दररोज चार ते पाच बदाम खाल्ल्याने तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतात. परंतु आवश्यकतेपेक्षा जास्त बदाम खाल्ल्याने तुमच्या आरोग्याला अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. आजच्या लेखात आम्ही तुम्हाला गरजेपेक्षा जास्त बदाम खाल्ल्याने तुमच्या आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतात हे सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात –

पचन बिघडू शकते

बदामांमध्ये भरपूर फायबर असते. तर अशावेळेस जास्त बदाम खाल्ल्याने तुमच्या पचनसंस्थेवर वाईट परिणाम होऊ शकतो. यामुळे गॅस, पोटफुगी, अपचन आणि पेटके यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

पौष्टिक कमतरता

जर तुम्ही जास्त बदाम खाल्ले तर तुमच्या शरीरात इतर पोषक तत्वांची कमतरता निर्माण होऊ शकते. कारण बदामात फायबरचे प्रमाण जास्त असते. म्हणून आपल्या शरीरात लोह, कॅल्शियम आणि झिंक शरीरात शोषले जाण्यापासून रोखते.

ॲलर्जी

जर तुम्ही जास्त बदाम खाल्ले तर तुमच्या घशात सूज आणि वेदना होऊ शकतात. त्यामुळे तुमच्या तोंडाला तसेच ओठांना आणि जीभेला खाज येऊ शकते. असे म्हटले जाते की जर तुम्हाला कोणतीही ॲलर्जी असेल तर तुम्ही कोणतेही ड्रायफ्रुट्स खाणे टाळावे, बदाम तर खाऊ नये.

किडनी स्टोनचा धोका

बदामांमध्ये ऑक्सलेट आढळते. त्यातच तुम्ही जर जास्त बदाम खाल्ले तर ऑक्सलेटची पातळी वाढू शकते. ते किडनीमध्ये जमा होऊन स्टोन तयार होऊ शकते. यामुळे तुम्हाला किडनी स्टोनचा त्रास सुरू होण्याची शक्यता असते.

वजन वाढू शकते

बदाम हेल्दी फॅट्सने समृद्ध असतात. त्यामुळे बदाम जास्त प्रमाणात खाल्ल्याने तुमच्या शरीरात कॅलरीजचे प्रमाण वाढू शकते. यामुळे तुमचे वजन वाढते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.