पावसाळा जितका आल्हाददायक असतो तितकाच काही प्रकारांमध्ये तो धोकादायकही ठरू शकतो. या ऋतूमध्ये घरात किंवा बाल्कनीत, किडे, साप घुसण्याची शक्यता जास्त असते. गावी किंवा शहरातही ज्यांच्या घराच्या आजूबाजूला गवत, वाढलेलं आहे. अशा सगळ्याच ठिकाणी साप निघण्याची भिती असतेच असते.
आणि जर साप घरात घुसरला तर स्वयंपाकघरात लपून बसण्याची जास्त शक्यता असते. कारण अन्नपदार्थांचा वास, शिवाय उंदीर आणि कीटक देखील त्यांना तिथे सहज सापडतात.
या गोष्टी सापांना तुमच्या घराकडे आकर्षित करू शकतात
आश्चर्याची गोष्ट म्हणजे स्वयंपाकघरात ठेवलेल्या काही सामान्य आणि दैनंदिन गोष्टी या धोक्याला आवर्जून आमंत्रण देतात. जर या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष दिले नाही तर हे संकट नक्कीच वाढू शकतं. चला जाणून घेऊयात की त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या सापांना तुमच्या घराकडे आकर्षित करू शकतात. तसेच ज्यांच्यामुळे आपल्या जीवाला देखील धोका निर्माण होऊ शकतो.
धान्ये आणि डाळी
जर तुम्ही तांदूळ, गहू किंवा डाळी उघड्यावर ठेवल्या असतील किंवा व्यवस्थित बंद केल्या नसतील तर ते उंदीर आणि कीटक तिथे जातात. जिथे उंदीर असतील तिथे सापही येतात. खरं तर, साप उंदरांची शिकार करतात, म्हणून उंदीर जर घऱाच्या आजूबाजूला असतील तर साप येणारच. त्यामुळे धान्य नेहमी हवाबंद डब्यातच ठेवा.
भाज्यांची साले आणि शिळे अन्न
जर तुम्ही स्वयंपाकघरातील कचऱ्याच्या डब्यात भाज्यांची साले, उरलेले अन्न किंवा फळे कुजण्यासाठी ठेवली असतील, तर हा वास उंदरांना आकर्षित करू शकतो. आणि त्यापाठोपाठ सापांना देखील. त्यासाठी दररोज कचरापेटी स्वच्छ करा आणि ओला कचरा झाकून ठेवा, किंवा लगेच टाकून या
अंडी आणि दुग्धजन्य पदार्थ
उघड्यावर ठेवलेले अंडी, दूध किंवा चीज यांसारखे दुग्धजन्य पदार्थ देखील उंदरांना आकर्षित करतात. या गोष्टी लवकर खराब होतात आणि त्यांचा वास कीटक आणि उंदरांना आकर्षित होतातच पण सापही त्या वासाने येतात. त्यामुळे दुग्धजन्य पदार्थ आणि अंडी शक्यतो उघड्यावर न ठेवता फ्रीजरमध्ये झाकून ठेवा.
पाळीव प्राण्यांचे अन्न आणि पक्ष्यांचे खाद्य
जर तुम्ही कुत्रा, मांजर किंवा पक्ष्याला खायला दिले आणि ते रात्रभर तिथे राहिले तर ते उंदरांसाठी मेजवानीसारखे असते. हे उंदीर रात्री येतात आणि अर्थातच सापही त्यांच्या वासाने त्यांची शिकार करायला येतात. खबरदारी म्हणून रात्री पाळीव प्राण्यांचे उरलेले अन्न स्वच्छ करा आणि पक्ष्यांना खाण्यासाठी वापरण्यात येणारे पदार्थ झाकून ठेवा.
सापांना कसे दूर ठेवावे ?
घर आणि स्वयंपाकघर स्वच्छ ठेवा
धान्य आणि अन्नपदार्थ बंद डब्यात ठेवा.
कचरापेटी दररोज रिकामी करा
रात्री पाळीव प्राण्यांचे अन्न बाजूला ठेवा
जवळपास झुडपे किंवा खड्डे असतील तर त्यांच्यावर लक्ष ठेवा. कारण साप अशाच खड्ड्यांमध्ये आढळतात.