आजच्या धावपळीच्या जीवनात तसेच बदलत्या जीवनशैलीत लोकं त्यांच्या आरोग्याची योग्य काळजी घेऊ शकत नाहीत. त्यामुळे वाढत्या वजनाच्या समस्येसोबतच हृदयरोग आणि मधुमेहाच्या समस्याही दिसून येत आहेत. यामागील कारण म्हणजे खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि अस्वस्थ जीवनशैली असल्याचे मानले जाते. असे म्हटले जाते की जर तुमचा आहार आणि दिनचर्या दोन्ही निरोगी असतील तर अनेक आजारांचा धोका आपोआप कमी होतो.
त्यातच मधुमेहाबद्दल बोलायचे झाले तर, ज्यांना हा आजार आहे त्यांना गोड पदार्थ खाण्यास सक्त मनाई असते. याशिवाय अल्ट्रा-प्रोसेस्ड अन्न आणि पॅक केलेले ज्यूस सेवन करता येत नाही. पण अशी काही फळे आहेत जी मधुमेह असला तरीही आरामात खाऊ शकता. आजच्या लेखात आम्ही तुम्हाला अशा फळांबद्दल सांगणार आहोत जे मधुमेही रूग्ण देखील सहज खाऊ शकता. चला सविस्तर जाणून घेऊयात –
जांभूळ
मधुमेहाच्या रुग्णांसाठी जांभूळ हे फळ वरदानापेक्षा कमी नाही. त्यात जाम्बोलिन आणि जाम्बुसिन नावाचे संयुगे चांगल्या प्रमाणात असतात. ते केवळ रक्तातील साखर नियंत्रित करत नाही तर इन्सुलिनची कार्यक्षमता देखील सुधारते. तुम्ही दररोज एक वाटी हे फळ खाऊ शकता.
पेरू
मधुमेहाच्या रुग्णांसाठीही पेरू खूप फायदेशीर मानला जातो. पेरूमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. ते खाल्ल्याने मधुमेही रूग्णांचे पोट बराच काळ भरलेले राहते, त्यामुळे जास्त खाणे टाळता येते . यामुळे वजनही कमी होतेच, पण त्याचवेळी पेरू खाल्ल्याने रक्तातील साखर देखील नियंत्रित ठेवता येते. तसेच पेरूमध्ये असलेले व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.
पपई
मधुमेही रुग्णांनी पपई खावी असे म्हटले जाते. त्यात असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर शरीरातील पेशींना नुकसान होण्यापासून रोखतात. पपईमध्ये कॅलरीज देखील कमी असतात. यामुळे मधुमेही रुग्णांना त्यांचे वजन समतोल राखणे सोपे होते.
बेरी
मधुमेहाच्या रुग्णांनी ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी आणि चेरी सारख्या बेरीजचे सेवन अवश्य करावे. हे एक प्रकारचे सुपरफूड आहेत. त्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर देखील चांगल्या प्रमाणात आढळतात. जे मधुमेही रूग्णांसाठी फायदेशीर आहे.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)