अटल सेतू म्हणजेच मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (एमटीएचएल) १३ जानेवारी २०२४ पासून सर्वसामान्यांच्या वापरासाठी खुला करण्यात आला.
जानेवारी २०२४ पासून आतापर्यंत अटल सेतूवरुन तब्बल १.३ कोटींपेक्षा जास्त वाहनांनी प्रवास केला आहे.
अटल सेतूचा सर्वाधिक वापर खासगी वाहनांनी केल्याची माहिती समोर आली आहे.
१३ जानेवारी २०२४ ते २४ जुलै २०२५ या कालावधीमध्ये २२ किमी लांबीच्या अटल पुलावरुन एकूण १,३१,६३,१७७ वाहनांनी प्रवास केला आहे.
नरेंद्र मोदी यांनी १२ जानेवारी रोजी उद्घाटन केले होते. २२ किमी लांबीपैकी ही लिंक १६.५ किमी समुद्रावरुन आणि ५.५ किमी जमिनीवरुन जाते.
देशातील सर्वात लांब सागरी लिंक असलेल्या या पुलामुळे मुंबई आणि नवी मुंबई दरम्यानचा प्रवास एका तासावरुन फक्त २० मिनिटांवर आला आहे.
उद्घाटनाच्या दुसऱ्या दिवशी २८,१७६ वाहनांनी पुलाचा वापर केला. यामुळे ५४.७७ लाख रुपये टोल महसूल निर्माण झाला होता.
१४ जानेवारी रोजी वाहनांची संख्या तब्बल दुप्पट होऊन ५४,९७७ इतकी झाली होती. टोलमार्फत १.०६ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते.