गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीची चर्चा रंगली आहे. आज उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी त्यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज सायंकाळी वरळी पोलिस कँम्पमधील मुंबईचा पोलिसांच्या राजाच्या पाद्यपूजन सोहळ्याला अमित ठाकरेंनी हजेरी लावली. यावेळी अदित्य ठाकरे न आल्यामुळे दोघांची भेट टळली. उद्धव ठाकरेच्या वाढदिवासानिमित्त अदित्य ठाकरे येवू शकले नसतील असं अमित ठाकरेंनी सांगितलं. यावेळी अमित ठाकरे यांनी युतीबाबत भाष्य केलं आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.
पत्रकारांशी बोलताना अमित ठाकरे यांनी, ‘गणोशोत्सव आनंदाचा क्षण असल्याचं पाहिला मिळतो. काल वरळीतील पोलिस बांधव आमंत्रण देवून केले. गेल्या वर्षी ही मी आलो होतो. आज आमचा मेळावा होता. तो रद्द झाला मात्र तो संपल्या वर मी येईल असं सांगितलं होतं’ असं विधान केलं आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीबाबत बोलताना अमित ठाकरे म्हणाले की, ‘उद्धव ठाकरे साहेब राज ठाकरे वाढदिवासाला शुभेच्छा दिल्या. मला कुटुंब म्हणून एकत्र आलेलो आहे याचा आनंद आहे. आजची भेट ही भेट वाढदिवसापुरती होती. महानगरपालिकासाठी युतीचा निर्णय ते दोन भाऊ घेतील. आम्ही ज्युनिअर ते निर्णय घेणार नाहीत. राज ठाकरे बोलतील ते होईल.’
या कार्यक्रमावेळी बोलताना ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे म्हणाले की, ‘आज पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या मुलांनी एकत्र येऊन केलेला हा कार्यक्रम आहे. अजून पुढच्या महिन्याभर वेगवेगळ्या कार्यक्रम या ठिकाणी होणार आहेत. ठाकरे हा ब्रँड आहे या शहराला ठाकरेंची गरज आहे. हे शहर ठाकरे यांना विचारत आणि त्यामुळे ते आले याचा आम्हाला आनंद आहे
उद्धव ठाकरे बोलले की माझ्यासाठी हा अतिशय आनंदाचा क्षण आहे. शेवटी रक्ताचे नातं आहे लक्षात ठेवा. राजकारणापलीकडे जाऊन ज्यांनी नाते जपले, त्याच्यापैकी उद्धव साहेब एक आहेत. हे नातं जेवढे घट्ट होईल तेवढे महाराष्ट्राला जास्त आनंद होईल उद्धव ठाकरे यांच्या शब्दातून हे स्पष्ट झाले. बाळा नांदगावकर जे बोलले ती वास्तुस्थिती आहे , ठाकरे ब्रॅंड आहे, वन प्लस वन हे 11 जसे होतात तसेच 11 प्लस 11 हे भविष्यात 22 देखील होतील, ठाकरे या नावात ताकद आहे. महाराष्ट्रातल्या जनतेची ही इच्छा आहे की युती व्हावी आणि ती इच्छा दोन्ही ठाकरे बंधू पूर्ण करतील असं वाटतंय.’