मोशी, ता. २७ : डुडुळगाव येथील सावतामाळी ट्रस्ट आणि ग्रामस्थांच्यावतीने नुकतीच संत श्री सावता महाराज संजीवन समाधी सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्या निमित्त संत श्री सावता महाराज मंदिरात काकडा आरती, दुपारी ३ ते ५ पर्यंत समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख यांची कीर्तन सेवा झाली.
सायंकाळी भव्य मिरवणूक आणि त्यानंतर महाआरती झाली. हजारो भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.