पतीच्या अटकेवर रोहिणी खडसेंची 24 तासानंतर पहिली प्रतिक्रिया, दिले मोठे संकेत…
Tv9 Marathi July 28, 2025 10:45 PM

ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना पुण्यातील खराडी येथे सुरू असलेल्या रेव्ह पार्टीतून ताब्यात घेण्यात आले आणि त्यांना अटकही करण्यात आली. पुणे पोलिसांनी रविवारी मध्यरात्री ही कारवाई केली. या पार्टीत दोन महिला पाच पुरुषांचाही समावेश होता. या पार्टीदरम्यानचा व्हिडीओ पुढे आल्याने खळबळ उडाली. नाथाभाऊंच्या जावयाचा रेव्ह पार्टीत समावेश असल्याचे कळताच राज्यातील राजकारणात भूकंप आला. यावरून आरोप प्रत्यारोप रंगताना दिसले.

पुणे पोलिसांनी यानंतर पत्रकार परिषद घेत सर्व गोष्टी लवकरच सांगितल्या जातील असेल स्पष्ट केले. या प्रकरणात काही कारवाया सुरू आहेत. त्या कारवायाच्या अंती जे तपासात निष्पन्न होईल, त्या पद्धतीने पुढील कारवाई होईल, असे सांगण्यात आले. या प्रकरणाबद्दल बोलताना एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले की, माझे जावई यामध्ये दोषी असतील तर त्यांना शासन व्हावे, पण पोलिस यंत्रणेने योग्य तो तपास करावा.

पतीला अटक झाल्यानंतर रोहिणी खडसे या काय बोलणार याकडे सर्वांच्या नजरा होत्या. आता शेवटी आज रोहिणी खडसे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीये. रोहिणी खडसे यांनी लिहिले की, कायद्यावर व पोलीस यंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास आहे… प्रत्येक गोष्टीला वेळ हेच उत्तर असतं… योग्य वेळी सत्य बाहेर येईल !..जय महाराष्ट्र!

कायद्यावर व पोलीस यंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास आहे. प्रत्येक गोष्टीला वेळ हेच उत्तर असतं. योग्य वेळी सत्य बाहेर येईल !

जय महाराष्ट्र! pic.twitter.com/9wMcarRLow

— Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse)

या पोस्टसोबतच रोहिणी खडसे यांनी पती प्रांजल खेवलकर याच्यासोबतचा एक फोटो देखील शेअर केलाय. या फोटोमध्ये दोघे कोणत्यातरी मंदिराबाहेर दिसत आहेत. रोहिणी खडसे यांनी त्यांच्या या पोस्टमध्ये बरेच काही सांगितले असून वेळ हेच योग्य उत्तर असल्याचे म्हटले असून योग्य वेळी सत्य बाहेर येईल, असेही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

पुण्यातील रेव्ह पार्टीचे आयोजन प्रांजल खेवलकर यांनीची केल्याचे सांगितले जातंय. दोन रूम या प्रांजल खेवलकर यांच्याच नावाने बूक केलेल्या व्हायरल झालेल्या पावत्यांवरून स्पष्टपणे दिसत आहे. रोहिणी खडसेंचे पती व्यावसायिक असून त्यांचे कामानिमित्त कायमच पुण्याला येणे जाणे सुरू असायचे. घटस्फोटानंतर रोहिणी खडसे यांनी प्रांजल खेवलकरसोबत लग्न केले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.