रॉयल एनफील्ड लवकरच 750 सीसी इंजिन असलेली एक नवीन बुलेट बाजारात आणणार आहे. 8 वर्षांपूर्वी रॉयल एनफील्डने इंटरसेप्टर 650 आणि कॉन्टिनेंटल जीटी 650 अशा दोन बुलेट भारतीय आणि जागतिक बाजारपेठेत लॉन्च केल्या होत्या. त्यानंतर आता कंपनी 750 सीसी सेगमेंटमध्ये प्रवेश करणार आहे. कंपनीने कॉन्टिनेंटल जीटी-आर 750 ची चाचणी सुरु केली असल्याची माहिती समोर आली आहे. या बाईकमध्ये नवीन 750 सीसी इंजिन मिळणार आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार 750 सीसी सेगमेंटमध्ये रॉयल एनफील्डची पहिली एन्ट्री कॉन्टिनेंटल जीटी-आर या बुलेटच्या स्वरूपात असणार आहे. मीडिया रिपोर्टमधील स्पाय इमेजवरून या बाईकची डिझाईन देखील समोर आली आहे. ही आतापर्यंतची सर्वात स्पोर्टी आणि शक्तिशाली कॉन्टिनेंटल जीटी मानली जात आहे. ही एक कॅफे रेसर स्टाईल बाईक आहे, त्यामुळे यात थोडी बेंड रायडिंग सिटींग पोज मिळणार आहे. या बुलेटमध्ये रेट्रो स्टाइल राउंड इंडिकेटर्स देखील मिळण्याची शक्यता आहे.
डिझाइन कशी असेल?
ही नवीन बुलेट एका नवीन पद्धतीने बनवण्यात आली आहे. यात पहिल्यांदाच ड्युअल फ्रंट डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत. त्याचबरोबर मागील बाजूस सिंगल डिस्क ब्रेक आणि क्रोम फिनिशसह ट्विन एक्झॉस्ट मिळणाह आहे. यचा लूक GT 650 सारखा असणार आहे. चाचणी दरम्यान ही बाईक पूर्णपणे झाकलेली होती, त्यामुळे तिचा ठळक लूक समोर आलेला नाही. मात्र रिपोर्ट्स नुसार त्यात अपसाईड फ्रंट फोर्क्स आणि मागील बाजूस कॉइल सस्पेंशन मिळण्याची शक्यता आहे. तसेच बुलेटमध्ये ऑल-ब्लॅक अलॉय व्हील्स, ट्यूबलेस टायर्स आणि क्लिप-ऑन हँडलबार मिळणार आहे.
बुलेट कधी लाँच होणार?
रॉयल एनफील्ड कॉन्टिनेंटल जीटी-आर 750 या बुलेटमध्ये 750 सीसी इंजिन असेल, जे 650 सीसी इंजिनच्या डिझाइनसारखे आहे. मात्र याची साईज मोठी आहे. सध्याचे 650 सीसी इंजिन 46.3 bhp पॉवर आणि 52.3 Nm टॉर्क जनरेट करते. 750 सीसी इंजिनची पॉवर आणखी वाढण्याची शक्यता आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, 750 सीसी कॉन्टिनेंटल जीटी नोव्हेंबरमध्ये इटलीतील मिलान येथे होणाऱ्या EICMA दुचाकी प्रदर्शनात प्रदर्शित केली जाऊ शकते, त्यानंतर भारतात ही बाईक 2026 च्या पहिल्या सहामाहीत लॉन्च होऊ शकते. कंपनीकडून या बाईकच्या किमतीची माहिती मिळालेली नाही, मात्र या बुलेटची किंमत 4 लाखांच्या आसपास असण्याची शक्यता आहे.